esakal | मुंबईत झाड पडून दोन मुलं जखमी, ४२ ठिकाणी झाडे पडल्याच्या तक्रारी
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत झाड पडून दोन मुलं जखमी, ४२ ठिकाणी झाडे पडल्याच्या तक्रारी

मुंबईत आता पर्यंत ४२ झाडे पडल्याच्या तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. यात पश्चिम उपनगरात २० पूर्व उपनगरात ५ आणि शहर विभागात ५ झाडे पडली आहेत.

मुंबईत झाड पडून दोन मुलं जखमी, ४२ ठिकाणी झाडे पडल्याच्या तक्रारी

sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबईः  मुंबई शहर आणि उपनगरात आजही मुसळधार पाऊस सुरुच आहे. हवामान विभागाने मुंबई परिसरात आज आणि उद्या रेड अलर्ट जारी केला आहे. सोमवारी रात्रीपासून पाऊस सुरु आहे. मंगळवारी पहाटे सव्वा दोन वाजल्याच्या सुमारास घरावर झाड पडल्याची घटना घडली आहे. या घटनेत दोन मुलं जखमी झालेत. चेंबूर येथे ही घटना घडली आहे. 

वाशी नाका येथील एचपी कॉलनीतील घरावर झाड पडून अदनाम शेख 5 वर्ष आणि इम्रान शेख 13 वर्ष ही दोन मुलं जखमी झाली. त्यांना गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

४२ ठिकाणी झाडे पडल्याच्या तक्रारी

मुंबईत आता पर्यंत ४२ झाडे पडल्याच्या तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. यात पश्चिम उपनगरात २० पूर्व उपनगरात ५ आणि शहर विभागात ५ झाडे पडली आहेत. शहरात २७ ठिकाणी शॉर्ट सर्किटच्या घटना घडल्या आहेत. यात शहर विभागात  १६ पूर्व उपनगरात ६ आणि पश्चिम उपनगरात ५ घटना नोंदवल्या आहेत. सुदैवाने कोणीही जखमी झालं नसल्याचं सांगण्यात आलंय. 

हेही वाचाः  मुंबई तुंबली!, मुसळधार पावसाचा फटका रेल्वेच्या अत्यावश्यक सेवेवर

मुंबईत सोमवारी सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात मागील २४ तासात ४२ झाडे आणि फांद्या उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत.  वेळीच सर्व ठिकाणी मदतकार्य पाठवण्यात आली आहेत. तर पावसामुळे सखल भागात साचलेल्या पाण्यामुळे शहरातील २५ ठिकाणांवरील वाहतूक ही पर्यायी मार्गांवर वळवण्यात आलीय. 

वाहतुकीत बदल करण्यात आलेले मार्ग

हिंदमाता, प्रतिक्षानगर, शेर काँलनी-चेंबूर, वांद्रे टाँकीज, शास्त्रीनगर-गोरेगाव, दहिसर सब वे, एस.व्ही.रोड अंधेरी मार्केट,अजित ग्लास- ओशिवरा पूल, खोदादाद सर्कल-दादर, शितल सिनेमा बैलबाजार- कुर्ला, विद्याविहार स्थानक, ओबेराँय माँल, मालाड सब वे, आशिर्वाद हाँटेल, भाऊ दाजी रोड, अंधेरी एमआयडीसी-मरोळ, बामन दया पाडा, मुलुंड एलबीएस मार्ग, गोल देऊळ, भेंडीबाजार, परळ ब्रीज, मालवणी म्हाडा काँलनी, अँण्टाँप हिल, संगम नगर, मराठा कॉलनी

अधिक वाचाः  मोठी दुर्घटना टळली, पश्चिम एक्सप्रेस हायवेजवळ दरड कोसळली

घोडबंदरमध्ये मुसळधार पावसानं घेतला पहिला बळी

मुसळधार पावसानं ठाण्यात पहिला बळी घेतला आहे. घोडबंदर रोडवर एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.  विजेच्या पोलचा धक्का लागून या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ठाण्यातील घोडबंदर रोडवरील ओवळा हनुमान मंदिराजवळ हा प्रकार दुर्देवी प्रकार घडला. या ठिकाणी रस्त्यावरील विद्युत खांबामध्ये अचानक वीज प्रवाह उतरला होता. खांबाला स्पर्श झाल्यामुळे एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अद्याप या मृत व्यक्तीची ओळख पटली नसून या व्यक्तीचा मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

(संपादनः पूजा विचारे)

Heavy Rain 42 tree falling increases last 24 hr two boys injuried

loading image