esakal | मोदींवर गोध्रा, शहांवर सोहारुबुद्दीन-लोहिया खटल्याचे आरोप; आदित्य ठाकरेंची इमेज खराब करण्याचा प्रयत्न
sakal

बोलून बातमी शोधा

मोदींवर गोध्रा, शहांवर सोहारुबुद्दीन-लोहिया खटल्याचे आरोप; आदित्य ठाकरेंची इमेज खराब करण्याचा प्रयत्न

अनिल परब म्हणाले की, सुशांतसिंग राजपूत प्रकरण बिहार निवडणुकीसाठी सुरु आहे

मोदींवर गोध्रा, शहांवर सोहारुबुद्दीन-लोहिया खटल्याचे आरोप; आदित्य ठाकरेंची इमेज खराब करण्याचा प्रयत्न

sakal_logo
By
प्रशांत बारसिंग

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गोध्रा, गृहमंत्री अमित शाहांवर सोहारुबुद्दीन-लोहिया खटल्याचे आरोप, असे सांगून राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंची इमेज खराब करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची प्रतिक्रिया परिवहनमंत्री ऍड. अनिल परब यांनी दिली आहे.

अनिल परब म्हणाले की, सुशांतसिंग राजपूत प्रकरण बिहार निवडणुकीसाठी सुरु आहे. आम्ही मुंबई पोलिसांच्या पाठीशी ठाम आहोत. मुंबई पोलीस तपासासाठी सक्षम आहेत. सीबीआयची मागणी कोणीही केली म्हणून केस त्यांच्याकडे देता येत नाही, त्याची कारणे द्यावी लागतात” असे अनिल परब म्हणाले.

महत्त्वाची बातमी - गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्यांसाठी ST सज्ज, ई-पासची गरज नाही; पण आधी 'हे' नियम वाचून घ्या...

गेल्या पाच वर्षात किती आत्महत्या झाल्या? त्यापैकी किती तपास सीबीआयकडे दिले? गेल्या पाच वर्षात किती हत्याकांड झाले? केवळ राजकारण म्हणून हे सुरु आहे. असा दावा अनिल परब यांनी केला. नितीश कुमार हे महाराष्ट्र पोलिसांचे प्रमुख नाहीत. त्यांनी त्यांच्या राज्याबाबत भाष्य करावे. असेही ते म्हणाले.

केवळ युवा नेत्याचे नाव खराब करायचे, मुख्यमंत्र्यांची इमेज खराब करण्यासाठी हे षडयंत्र आहे. पुरावे असतील तर पोलिसांकडे द्यावे. नरेंद्र मोदी यांच्यावरही गोध्रा हत्याकांडाचे आरोप झाले. अमित शाह यांचेही नाव सोहराबुद्दीन प्रकरणात समोर आले. न्यायमूर्ती लोहिया केसमध्येही शाह यांच्यावर आरोप झाले. असे दाखले अनिल परब यांनी दिले.

मोठी बातमी - "सुशांतसिंग राजपूतची आत्महत्या नाही, हत्याच..."

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाशी आदित्य ठाकरेंचा संबंध नाही. कोण म्हणते ते पार्टीला गेले, कोण म्हणते नाही गेले. ज्यांच्याकडे पुरावे आहेत, त्यांनी ते मीडियासमोर घेऊन सिद्ध करावे. एखाद्याचे करिअर खराब करण्याचा प्रकार आहे. ट्रोलर्सविरोधात काही कार्यकर्त्यांनी तक्रारी केल्या आहेत, असे अनिल परब यांनी सांगितले. 

अमृता फडणवीसांनी खुशाल राज्य सोडावे

सरकार बदलले तरी पोलिस तेच राहतात. ज्यांची सुरक्षा घेऊन त्या गेली पाच वर्ष फिरल्या, त्या पोलिसांवरच अविश्वास असेल, तर अमृता फडणवीसांनी खुशाल राज्य सोडून जावे, असे अनिल परब म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी ज्यांची सतत स्तुती केली, शाबासकी दिली. त्या पोलिसांबद्दल केवळ खुर्ची गेली म्हणून असे बोलणे चुकीचे आहे. अमृता फडणवीसांना असुरक्षित वाटावे असे काय घडले? कुठला मुंबईचा नागरिक म्हणतो की त्यांना असुरक्षित वाटते. ही खुर्ची गेल्याची तडफड दिसते, असा टोला अनिल परब यांनी लगावला.

Inside story : अयोध्येत मिशीसहित श्रीरामांच्या मूर्तीची का होतेय मागणी?

अडवाणींना निमंत्रण दिले का?

राम मंदिर उभारण्याचा पाया शिवसेनेने रचला आहे, कळसही आम्हीच चढवू. शिवसेनेला निमंत्रण आले नाही, पण आधी लालकृष्ण अडवाणींना निमंत्रण दिले का तपासावे लागेल, असा टोलाही अनिल परब यांनी लगावला.

( संकलन - सुमित बागुल )

attempt to tarnish Aditya Thackerays image says anil parab in retaliation