esakal | हसन मुश्रीफ प्रकरण; किरीट सोमय्या ईडी कार्यालयात
sakal

बोलून बातमी शोधा

Kirit Somaiya

हसन मुश्रीफ प्रकरण; किरीट सोमय्या ईडी कार्यालयात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ (hasan mushrif) यांच्यावर मनी लॉंड्रीगचे (money laundering) आरोप (Allegations) केल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या (kirit Somaiya) यांनी ईडी कार्यालयात (Enforcement Directorate) गाठले. या दरम्यान ईडी अधिकाऱ्यांसोबत या प्रकरणी 40 मिनिटे चर्चा (Discussion) झाल्याचा दावा सोमय्या यांनी केला. एक ट्विट (tweet) करून सोमय्या यांनी स्वतः ही माहिती दिली.

हेही वाचा: टंचाईग्रस्त कांबे गावाला गणेशोत्सवात रोज टँकर; हायकोर्टात सरकारची हमी

सोमवारी पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ आणि त्यांच्या मुलावर आरोप केले होते. या प्रकरणात माझ्या 2700 पानांच्या कागदपत्रांची आणि मी केलेल्या तक्रारीची चौकशी करण्याचे आश्वासन ईडी अधिकाऱ्यांनी दिल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी ट्विटद्वारे केला. जवळपास 127 कोटीचे मनी लॉन्ड्रिंग, शेल कंपन्यांचे व्यवहार मुश्रीफ यांच्या सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याने केल्याचा आरोप सोमय्या यांनी लावला होता. या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी दिल्लीत जाऊन ईडी संचालक, सीबीडीटी अध्यक्ष, अर्थ मंत्रालय सचिव आणि अर्थ राज्यमंत्र्याची भेट घेणार असल्याची माहितीही किरीट सोमय्या यांनी दिली.

loading image
go to top