मुंबई पोलिसांच्या नव्या कुल बाईक पाहिल्यात का? ताफ्यात आल्या 250 सीसी स्पोर्ट्स बाईक्स

अनिश पाटील - सकाळ वृत्तसेवा
Saturday, 25 July 2020

कोरोना रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी एका योद्ध्याची भूमिका बजावली. आता हाच आपला योद्धा अधिक कुल बाईकवरून गस्त घालताना दिसणार आहे. कारण मुंबई पोलिसांना ताफ्यात नव्या 250 सीसी स्पोर्टस बाईक्स सामील झाल्या आहेत.

मुंबई : कोरोना रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी एका योद्ध्याची भूमिका बजावली. आता हाच आपला योद्धा अधिक कुल बाईकवरून गस्त घालताना दिसणार आहे. कारण मुंबई पोलिसांना ताफ्यात नव्या 250 सीसी स्पोर्टस बाईक्स सामील झाल्या आहेत.

नवी मुंबईकरांनो सावधान, कोरोनासह 'हे' आजारही वाढवतायत नवी मुंबईकरांची चिंता...

गेल्या तीन वर्षात मुंबई पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जगातील अभिनव व उत्तम यंत्रणा तयार केली आहे.  तसेच पोलिसांच्या सुलभतेसाठी नवनवीन प्रयोग देखील करण्यात येत आहेत. देशातील अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली यंत्रणा मुंबई पोलिसांकडे आहे. त्याच्या वापरातून पोलीस दलाने आपली कार्यक्षमता व पारदर्शकता देखील वाढवली आहे. मुंबई पोलीस माहिती यंत्रणा (एमपीआयएस), ऑटोमेटेड बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम, एम पासपोर्ट, संवाद ॲप्स, ट्विटर हँडल, मोबाईल सर्व्हेलन्स वाहने यामुळे पोलिसांच्या कामाला वेग आला आहे. काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी त्यांच्या दलात अश्व दलाचा समावेश करून घेतला. स्वातंत्र्यपूर्व काळात मुंबईत पोलिसांकडे अश्वदल कार्यरत होतं. 1932 मध्ये हे दल बंद करण्यात आलं होतं. आता 88 वर्षांनी हे युनिट सुरु होतं आहे. इतर राज्यांमध्ये अशा पद्धतीचे अश्वदल होतं. या दलामध्ये 30 घोडे आहेत. त्यानंतर लगेचच समुद्र किनारी गस्तीसाठी 50 सॅगवेचा पोलिस दलात समावेश करून घेतला. यातील दहा  सेग वे हे वरळी साठी तर पाच नरिमन पॉइंट साठी आहेत. त्याचप्रमाणे बांद्रा, जुहू, वर्सोवा या ठिकाणी देखील हे सेग वे देण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली.

तरुणीचा हा व्हिडिओ शेअर करत बिग बी म्हणाले, तुझ्यामुळे माझा हॉस्पिटलमधील दिवस... - 

दरम्यान पोलिस दलात गस्तीसाठी वापरण्यात येणा-या अनेक दुचाकी जुन्या झाल्या आहेत. बीट मार्शलने बुलेटचा वापर करून पोलिस ठाण्याच्या हद्दीत परिणामकारक गस्त घालावी म्हणून पोलिस आयुक्तालयाकडून मुंबईतील सर्व पोलिस ठाण्यास प्रत्येकी दोन हायस्पीड बुलेट देण्यात आल्या. मात्र त्यांची आयुमर्यादा ही संपली आहे. म्हणूनच पोलिस दलात आता नव्या कोऱ्या 250 सीसी स्पोर्टस बाईक सामील करून घेतल्या जाणार आहेत. सध्या वाहतुक पोलिसांना अशा 10 दुचाकी प्राप्त झाल्या आहेत. या दुचाकीचे वैशिष्ठ म्हणजे त्या उंचीला कमी, पळण्यात तेज आणि पोलिसांसाठी लागणाऱ्या सर्व सुविधा त्यात असणार आहेत. याशिवाय डिक्स ब्रेक, सेल्फ स्टार्ट, माईक सिस्टम, ब्लिकंर लाईट, सामान ठेवण्यासाठी डिक्की अशा सुविधा या दुचाकींमध्ये आहेत. त्यामुळे बुलेटमध्ये फिरणारा सिंघम पोलिस आता धूम स्टाईल बाईकमध्ये फिरताना दिसणार आहे

-----------------------------------------------

Edited by Tushar Sonawane


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Have you seen the new bikes of Mumbai Police? 250 cc sports bikes in the convoy