कोरोनाचा कहर; ठाणे जिल्ह्यासाठी धोक्याची घंटा

राहुल क्षीरसागर
सोमवार, 27 एप्रिल 2020

ठाणे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोबाधित रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होत आहे. या आजारामुळे अनेक रुग्णांना प्राण देखील गमवावे लागले आहेत. जिल्ह्यात कोरोनाने मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शिरकाव केला. त्यावेळी रुग्णांची संख्या तुरळक होती. मात्र, एप्रिल महिन्याच्या 26 दिवसात 652 बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे एप्रिल महिना ठाणे जिल्ह्यातील घातक ठरला असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील सध्या बाधितांचा आकडा 700 च्या उंबरठ्यावर आहे. वेळीच ही साथ न रोखल्यास जिल्ह्यासाठी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव धोक्याची घंटा ठरण्याची शक्यता आहे.

ठाणे : ठाणे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोबाधित रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होत आहे. या आजारामुळे अनेक रुग्णांना प्राण देखील गमवावे लागले आहेत. जिल्ह्यात कोरोनाने मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शिरकाव केला. त्यावेळी रुग्णांची संख्या तुरळक होती. मात्र, एप्रिल महिन्याच्या 26 दिवसात 652 बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे एप्रिल महिना ठाणे जिल्ह्यातील घातक ठरला असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील सध्या बाधितांचा आकडा 700 च्या उंबरठ्यावर आहे. वेळीच ही साथ न रोखल्यास जिल्ह्यासाठी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव धोक्याची घंटा ठरण्याची शक्यता आहे.

क्लिक करा : चिंताजनक! ठाणे जिल्ह्यात गेल्या 24 तासात 71 नवे रुग्ण

ठाणे जिल्ह्यात ठाणे महापालिका क्षेत्रात 13 मार्च रोजी पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला. त्यानंतर 14 मार्च रोजी कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोनाने शिरकाव केला. त्यामुळे एकट्या मार्च महिन्यातील 19 दिवसात 35 कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झाली होती. मात्र, जसा एप्रिल महिना उजाडला तसा या आजाराचा फैलाव अधिक तीव्रतेने होवू लागला.

13 एप्रिलला बाधित रुग्णांची संख्या 46 वर गेली. त्यानंतर रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच गेली. रविवारी, 26 एप्रिल या एका दिवसात सर्वाधिक 72 बाधित रुग्णांची नोंद झाली असून एप्रिल महिन्याच्या 26 दिवसात 652 बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहता ठाणे जिल्ह्यासाठी भविष्यातील धोक्याची घंटा ठरत आहे. 

क्लिक करा : मुंबईकरांची चिंता पुन्हा वाढली! कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ

दाटीवाटीच्या लोकसंख्येमुळे रुग्ण वाढले
देशभरात कोरोना या विषाणूने हाहाकार उडवून दिला आहे. त्यात महाराष्ट्र राज्यात देखील या आजाराने थैमान घातले आहे. राज्यात पुणे जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. मुंबईप्रमाणे ठाणे जिल्ह्यातील शहरी भागात मोठ्या प्रमाणात दाटीवाटीचे क्षेत्र आहे. त्यामुळे या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण वाढण्याची भीती सुरुवातीपासूनच व्यक्त करण्यात येत होती. त्यात ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि मीरा भाईंदर या प्रमुख चार महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधित रुग्णाची संख्या अधिक असल्याचे दिसून येत आहे.

  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The havoc of the corona; Threat to Thane district