हवाला ऑपरेटरला दिलासा नाही

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 जानेवारी 2019

मुंबई - दादरमधील कबुतरखाना, ऑपेरा हाउस आणि झवेरी बाझार येथे 13 जुलै 2011 रोजी झालेल्या बॉंबस्फोट प्रकरणातून दोषमुक्त करण्याच्या मागणीचा कंवलनयन वझीरचंद पाथरेजा (वय 50) या हवाला ऑपरेटरचा अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला. या स्फोटांसाठी पैसा पुरवल्याचा आरोप पाथरेजावर आहे.

"इंडियन मुजाहिद्दीन' या दहशतवादी संघटनेचे म्होरके रियाज भटकळ आणि यासिन भटकळ यांना बॉंबस्फोटांसाठी हवाला मार्गाने 10 लाख रुपये दिल्लीतील कंवलनयन पाथरेजा याने दिल्याचा आरोप दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) ठेवला आहे. त्याने हा आरोप अमान्य करत, ही रक्कम स्फोटांसाठी वापरली जाणार असल्याची माहितीच नव्हती, असा दावा दोषमुक्तीसाठी केलेल्या अर्जात केला होता. पैसे घेण्यासाठी भटकळ आपल्या घरी आला; तेव्हा त्याने ओळख सांगितली नव्हती. पैसे कोणत्या कामासाठी वापरले जाणार आहेत, याचीही माहिती दिली नव्हती, असे पाथरेजाचे म्हणणे होते. या प्रकरणातून दोषमुक्त करावे, असा अर्ज त्याने जानेवारी 2018 मध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत (मोक्‍का) विशेष न्यायालयात केला होता. मोका न्यायालयात अर्ज फेटाळण्यात आल्यामुळे त्याने उच्च न्यायालयात अपील केले होते. याप्रकरणी न्या. इंद्रजित महंती आणि न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर नुकतीच सुनावणी झाली.

Web Title: Hawala Operator Form Reject by High Court