गौतम नवलाखांबाबतचा निकाल उच्च न्यायालयाने ठेवला राखून

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जुलै 2019

नक्षलींना पाकिस्तानच्या अतिरेकी संघटना हिज्बुल मुजाहिद्दीनकडून पाठबळ मिळते आणि यामध्ये नवलखा यांची भूमिकाही महत्वाची आहे, असा दावा सरकारने केला आहे. मात्र नवलखा यांच्या वतीने या दाव्यात तथ्य नसल्याचे म्हटले आहे.

मुंबई : शहरी नक्षलवादासंबंधित आरोप असलेले विचारवंत गौतम नवलखा यांच्या विरोधात पुणे पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याच्या नवलखा यांच्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाली असून उच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे.

नक्षलींना पाकिस्तानच्या अतिरेकी संघटना हिज्बुल मुजाहिद्दीनकडून पाठबळ मिळते आणि यामध्ये नवलखा यांची भूमिकाही महत्वाची आहे, असा दावा सरकारने केला आहे. मात्र नवलखा यांच्या वतीने या दाव्यात तथ्य नसल्याचे म्हटले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: HC not Declare Decision regarding Gautam Navlakha