
मराठा आरक्षणासाठी मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनात परवानगीपेक्षा जास्त आंदोलक सहभागी झाले आहेत. या आंदोलकांवर जरांगेंचं नियंत्रण नाहीय. आंदोलनाच्या आम्ही विरोधात नाहीय. पण नियमांचं उल्लंघन होत असल्याचं निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवलंय. मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे मुंबईकरांना त्रास सहन करावा लागत असल्याच्या मुद्द्यावरून हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. वकील गुणरत्न सदावर्ते यांनी ही याचिका दाखल केलीय. या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने मनोज जरांगे पाटील आणि वीरेंद्र पाटील या दोघांना नोटीस बजावली आहे. कोर्टातली आजची सुनावणी स्थगित करण्यात आली असून उद्या दुपारी ३ वाजता पुन्हा सुनावणी घेऊ आणि काय ते ठरवू असं हायकोर्टाने म्हटलंय.