esakal | ‘एचडीएफसी लाइफ’ घेणार एक्साइड लाइफला ताब्यात
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

‘एचडीएफसी लाइफ’ घेणार एक्साइड लाइफला ताब्यात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई: खासगी आयुर्विमा क्षेत्रातील आघाडीच्या एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स कंपनीने एक्साइड लाइफ इन्शुरन्स कंपनीचा १०० टक्के हिस्सा ताब्यात घेणार असल्याचे आज जाहीर केले. हा व्यवहार ६६८७ कोटी रुपयांना होणार असल्याचे सांगण्यात आले.

एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स, एक्साईड इंडस्र्टीज आणि एक्साइड लाइफ इन्शुरन्स या कंपन्यांच्या संचालक मंडळाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत या व्यवहाराला मान्यता देण्यात आली, असे एचडीएफसी लाइफ इन्शुरन्सने आपल्या निवेदनात म्हटले आहे. भारतीय आयुर्विमा क्षेत्रातील हा एक महत्त्वपूर्ण व्यवहार असल्याची प्रतिक्रिया एचडीएफसी लाइफचे अध्यक्ष दीपक पारेख यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा: बोईसरमध्ये कंपनीत मोठा स्फोट; एकाचा मृत्यु, चार गंभीर जखमी

एचडीएफसी लाइफच्या व्यवस्थापकीय संचालक विभा पडळकर यांनी याबाबतची माहिती आज दिली. त्या म्हणाल्या, की देशातील एकूण आयुर्विमा बाजारपेठेच्या तुलनेत आमच्या कंपनीची प्रगती अधिक वेगाने होत आहे. या क्षेत्रातील अन्य कंपनी संपादित करून या प्रगतीला आणखी वेग देण्याची संधी आम्ही घेत आहोत. याच विचारसरणीनुसार, आम्ही एक्साइड इंडस्ट्रीजकडून एक्साइड लाइफ इन्शुरन्सचा १०० टक्के हिस्सा ताब्यात घेणार आहोत. आयआरडीए, सीसीआय, एनसीएलटी, स्टॉक एक्स्चेंजेस आणि दोन्ही कंपन्यांच्या शेअरधारकांच्या मान्यतेनंतर हा व्यवहार पूर्ण होणार आहे. एक्साइड लाइफ इन्शुरन्सच्या संपादनाची प्रक्रिया दोन टप्प्यांत पूर्ण केली जाणार आहे.

या प्रस्तावित व्यवहारामुळे एचडीएफसी लाइफचे वितरण जाळे अधिक विस्तारणार असून, ग्राहकांना व्यापक योजनांचे पर्याय उपलब्ध होऊ शकणार आहेत. एक्साइड लाइफ इन्शुरन्स कंपनीचे दक्षिण भारतात, विशेषतः टियर-२, टियर-३ गावांत चांगले अस्तित्व आहे. यामुळे एचडीएफसी लाइफच्या एजन्सी व्यवसायाला गती मिळणार असून, ‘एक्साइड लाइफ’ हा ब्रँड आगामी दोन वर्षे वापरता येणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.

loading image
go to top