त्याने बियरची बाॅटल फोडली आणि स्वतःच्याच गळ्यावर...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 फेब्रुवारी 2020

उल्हासनगरच्या भाटिया चौकातील प्रकार

उल्हासनगर : उल्हासनगरच्या भाटिया चौकात एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने बियरची बाॅटल भर चौकात फोडून स्वतःच्याच गळ्यावर फिरवत आत्महत्या केली आहे. 

हेही वाचा - विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी

अहमदनगरचा रहिवाशी असणारा मधुकर गायकवाड कामानिमित्ताने उल्हासनगर येथे आला होता. मधुकरचे घर अहमदनगरमध्येच असून तो उल्हासनगरमध्ये आपल्या बहिणीकडे वास्तव्यास होता.

महत्त्वाची बातमी - आरक्षणात रखडली म्हाडाची सोडत

अशी केली आत्महत्या...

उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 5 मध्ये असलेल्या भाटिया चौकाच्या परिसरात डायमंड बियर शॉप नावाचे दुकान आहे. या दुकानात मधुकर आला. त्याने  तिथून एक बियरची बाटली विकत घेतली आणि दुकानाबाहेर येऊन ती बाटली फोडली. फुटलेली बाटली थेट स्वतःच्या गळ्यात खुपसली. बाटलीला अत्यंत धार असल्याने प्रचंड प्रमाणात रक्तस्राव झाला. ज्यामुळे मधुकरचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, प्रकरणाचा पुढील तपास हिललाईन पोलिस करत आहेत. 

web title : He breakes a beer bottle and rolls it around on his own throat


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: He breakes a beer bottle and rolls it around on his own throat