विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी..! लवकरच सुरू होतंय 'हे' केंद्र

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 20 February 2020

देशातील प्रशासकीय सेवेत ठसा उमटवण्यासह तरुण-तरुणींना मार्गदर्शन करण्यासाठी ठाणे महापालिकेने 33 वर्षांपूर्वी सुरू केलेल्या चिंतामणी देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या धर्तीवर नवी मुंबई पालिकेच्या वतीने बेलापूर येथे अद्ययावत प्रशिक्षण संस्था उभारण्यात येणार आहे. 

नवी मुंबई : देशातील प्रशासकीय सेवेत ठसा उमटवण्यासह तरुण-तरुणींना मार्गदर्शन करण्यासाठी ठाणे महापालिकेने 33 वर्षांपूर्वी सुरू केलेल्या चिंतामणी देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या धर्तीवर नवी मुंबई पालिकेच्या वतीने बेलापूर येथे अद्ययावत प्रशिक्षण संस्था उभारण्यात येणार आहे. 

ही बातमी वाचली का? निवडणूक येताच 'त्यांची' घरोघरी मांदियाळी!

नवी मुंबईला शैक्षणिक हब म्हणून ओळखले जाते. यामुळे नवी मुंबईतून जास्तीत जास्त सनदी अधिकारी तयार व्हावेत या हेतूने आयएएस अकादमी हे प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी केंद्र, ग्रंथालय, प्रशिक्षण देणारी संस्था यांची जुळवाजुळव प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. राज्यातील श्रीमंत पालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई महापालिकेने शहरात स्वतःचे मुख्यालय, मोरबे धरणासारखे काही लक्षवेधी प्रकल्प उभारले आहेत. 

ही बातमी वाचली का? नवी मुंबईत हजारो आंदोलकांची धरपकड; वाचा नेमकं काय झालं?

शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख दिवंगत आनंद दिघे यांच्या प्रयत्नाने ठाणे पालिकेने जुन्या पालिका मुख्यालयात पहिले अर्थमंत्री सी. डी. देशमुख यांच्या नावे प्रशासकीय सेवा प्रशिक्षण संस्था सुरू केली आहे. अशाच पद्धतीची प्रशिक्षण संस्था सुरू करणारी ठाणे पालिका ही देशातील एकमेव पालिका आहे. या प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण घेतल्यानंतर सनदी अधिकारी झालेले शेकडो तरुण-तरुणी देश आणि राज्यातील शासकीय सेवेत कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. ठाण्यातील या प्रशासकीय प्रशिक्षण सेवेतून अधिक संदर्भ पुस्तिका, मासिके आणि वृत्तपत्रे विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. याशिवाय मातब्बरांकडून प्रशिक्षणही दिले जाते. याच धर्तीवर नवी मुंबई पालिका प्रशासकीय सेवा अकादमी सुरू करण्यात येणार आहे. 

ही बातमी वाचली का? शोएब अख्तरचे भारत-पाकिस्तानबद्दल मोठे विधान

मागील सहा महिन्यांपासून पालिका क्षेत्रात आयएएस अकादमी सुरु करण्याचा विचार सुरू आहे. यामधून प्रशासकीय सेवेसाठी तरुणांना तयार करण्यासाठी उपलब्ध सर्व सुविधा देण्यात येणार आहेत. हे केंद्र पालिकेने चालवावे की खासगी संस्थेला अटी व शर्तीवर द्यावे, याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. 
- अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, नवी मुंबई महापालिका. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The competitive examination center will be opened in Navi Mumbai soon