आरक्षणात रखडली म्हाडाची सोडत

File Photo
File Photo

मुंबई : जानेवारी महिन्याच्या अखेरीस म्हाडाच्या कोकण मंडळाची सुमारे ९ हजार २०६ घरांच्या सोडतीची जाहिरात काढण्यात येणार होती; परंतु या सोडतीमध्ये चतुर्थ श्रेणी सरकारी कर्मचारी आणि पोलिसांसाठी प्रत्येकी १० टक्के घरे आरक्षित ठेवण्याचा प्रस्ताव म्हाडा प्राधिकरणाने गृहनिर्माण विभागाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. त्यामुळे कोकण मंडळाच्या या सोडतीला विलंब झाला आहे. या सोडतीमध्ये सर्वाधिक ८ हजार ५७८ घरे अत्यल्प उत्पन्न गटासाठी (ईडब्ल्यूएस) उपलब्ध आहेत. तसेच या सोडतीत मध्यम उत्पन्न गट (एमआयजी) आणि उच्च उत्पन्न गटासाठी (एचआयजी) एकही घर नसल्याने या दोन्ही गटातील अर्जदारांचा यंदा हिरमोड होणार आहे.

म्हाडाच्या कोकण मंडळाने या वर्षी मुंबईकरांना सोडतीचे भेट देण्याची तयारी केली होती. त्याप्रमाणे जानेवारी महिन्याच्या अखेरीस जाहिरातही काढण्यात येणार होती; परंतु ऐनवेळी गृहनिर्माण विभागाने सोडतीत पोलिस आणि चतुर्थ श्रेणी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येकी १० टक्के घरे आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार म्हाडाच्या कोकण मंडळाने दोन्ही प्रवर्गांसाठी प्रत्येकी १० टक्के घरांचे आरक्षण लागू करून त्याबाबतचा प्रस्ताव म्हाडा प्राधिकरणाकडे सादर केला. प्राधिकरणाने हा प्रस्ताव गृहनिर्माण विभागाकडे मंजुरीसाठी पाठवल्याने सोडत लांबणीवर गेली आहे. गृहनिर्माण विभागाकडून हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर सोडत काढण्यात येणार आहे. या सोडतीमध्ये पंतप्रधान आवास योजना (पीएमएवाय) आणि खासगी विकसकांकडून म्हाडाला मिळणाऱ्या घरांचाही समावेश आहे.

खासगी विकासकांकडून म्हाडाला सुमारे २ हजार १२७ घरे उपलब्ध झाली आहेत. यामध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी १ हजार ५८७, तर अल्प उत्पन्न गटासाठी ५४० घरे राखीव आहेत. तसेच पंतप्रधान आवास योजनेची तब्बल ७०७९ घरे या सोडतीमध्ये असून त्यात ८८ घरे अल्प उत्पन्न गटासाठी असून इतर सर्व घरे अत्यल्प उत्पन्न गटासाठी आहेत. या प्रकारे एकूण ९ हजार २०६ घरांची सोडत काढण्यात येणार असून या घरांच्या किमती सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्‍यात असल्याचे म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

एकाच ठिकाणी मिळणार घरे? 
पोलिस आणि चतुर्थ श्रेणी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एकाच ठिकाणी घरे उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्तावही म्हाडाने गृहनिर्माण विभागाकडे पाठवला आहे. तोही मंजूर झाल्यास पोलिस व सरकारी कर्मचाऱ्यांना एकाच इमारतींमध्ये घरे मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.

एकूण 
९२०६ घरे

अत्यल्प उत्पन्न गटासाठी 
८५७८ घरे 

अल्प उत्पन्न गटासाठी घरे 
६२८ घरे

इथे असतील घरे -
ठाणे जिल्ह्यात खोणी, अंतर्ली, मनकोली, कासारवडवली, पारसिक, वडवली, कावेसर अाणि डावले.
नवी मुंबईत घणसोली

Mhada's lottery delayed in reservation

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com