esakal | गोवंडी पूर्व व कुर्ला एल विभागात मलेरिया डेंग्यू ची डोके दुखी
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

गोवंडी पूर्व व कुर्ला एल विभागात मलेरिया डेंग्यू ची डोके दुखी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चेंबूर : मुंबईत कोरोना रुग्ण संख्या कमी होत असताना आता उपनगरातील विविध भागात साथीच्या रोग वाढत असल्याने नागरिकाना व पालिकेला डोके दुखी ठरत आहे.

चेंबूर एम पश्चिम व पूर्व व एल विभागात मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी विभाग आहे. वाशीनाका, पीएल लोखंडे मार्ग, माहुल, गोवंडी, सिध्दार्थ कॉलनी, शिवाजी नगर, चुनाभट्टी, काजू पाडा, लालडोंगर व कसाई वाडा या झोपडपट्टी

कष्टकरी व मध्यम वर्गीय मोठ्या प्रमाणात रहात आहे. पावसाळ्यात मोठ्याप्रमाणात घाणीचे साम्राज्य, दूषित पाणी, घरावर टाकलेले कागदी कागद त्यात साचलेले पाणी तसेच कित्येक दिवस पाणी वापरत असल्याने त्यात जंतूंची पैदास होत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात मलेरिया डेंग्यु, कावीळ सारखे रोग पसरत आहे.

हेही वाचा: मुंबईत रुग्ण वाढले, मृत्यू कमी

या परिसरात २०१९ च्या मानाने रुग्ण कमी असले तरी यावर्षी मात्र या रुग्णांची संख्या अधिक आहे. गेल्या वर्षी मात्र कोरोना मुळे मलेरिया व डेंग्यू रुग्णांच्या संख्याची पालिकाकडे नोंद झालेली नाही. यावर्षी एल विभागात जुलै मध्ये एकूण संख्या १८ तर ऑगस्ट मध्ये एकूण संख्या १५ आहे तर चेंबूर एम पश्चिम परिसरात जुलै महिन्यात एकूण संख्या २० रुग्ण सापडले तर ऑगस्ट मध्ये एकूण संख्या २८ पेक्षा अधिक रुग्ण आढळलेले आहेत. हीच परिस्थिती एम पूर्व विभागात ही आहे. रुग्णांची संख्या सप्टेंबर महिन्यात अजून वाढणार यात शंका नाही.

जुलै महिन्यात घाटला या ठिकाणी राहणाऱ्या एका तरुणांचा मलेरियाने मृत्यू झाला होता. तर गोवंडी येथील शताब्दी रुग्णालय व चेंबूर येथील माँ रुग्णालायात तापाने फणफणत कित्येक रुग्ण येत आहेत. मलेरिया व डेंग्यू रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर पालिका रुग्णालयात रुग्णाच्या उपचाराकरिता खाटा कमी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा: मुंबईत भाज्या महागल्या : फ्लॉवर 60 ते 80 रु. किलो

पालिका रुग्णालयात ताप येत असलेले रुग्ण कित्येक उपचारा करिता येत असतात यातील दरदिवशी १०० पेक्षा अधिक रुग्णाचे मलेरिया डेंग्यू स्वयंषयीत म्हणून स्लाईट चेक केल्यात जात असल्याने त्यात किमान एक रुग्ण तरी मलेरिया किव्हा डेंग्यू चा आढळत आहे.

पालिका प्रशासनाकडून धूरफवारणी तसेच विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.

चेंबूर परिसरात मलेरिया रुग्णांची संख्या वाढल्यास रुग्णालयांवर ताण येणार असून उपचारासाठी रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढल्यास सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. डेंग्यू, मलेरिया रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर पालिका प्रशासनासमोर मोठं आव्हान निर्माण होईल यात शंका नाही.

loading image
go to top