

community health participatio
ESakal
फेब्रुवारी ते मार्च या अवघ्या दोन महिन्यांत धारावीमध्ये मोठ्या प्रमाणावर राबविण्यात आलेल्या आरोग्य-जागृती उपक्रमात धारावीतील सुमारे १०,००० महिला व तरुणींनी सहभाग नोंदवला आहे. अलीकडच्या काळातील हा उपक्रम या भागातील सर्वात व्यापक उपक्रमांपैकी एक मानला जात आहे. शाळा आणि विविध वस्त्यांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामुळे महिलावर्गात आरोग्य, स्वच्छता आणि वैयक्तिक सुरक्षिततेसंदर्भातील चर्चेला नवी दिशा मिळत असून, याआधी न बोलल्या जाणाऱ्या विषयांवर आता मोकळेपणाने संवाद होऊ लागला आहे.