Diwali 2020 : अभ्यंगस्नान परंपरेला आरोग्याची आहे जोड, वाचा अभ्यंगस्नानाचे आरोग्यदायी फायदे

Diwali 2020 : अभ्यंगस्नान परंपरेला आरोग्याची आहे जोड, वाचा अभ्यंगस्नानाचे आरोग्यदायी फायदे

मुंबई : दिवाळी म्हंटल की सकारात्मकता आपसूक येतेच. अंधारातून उजेडाकडे नेणारा प्रकाशाचा सण म्हणजे दिवाळी. दिवाळी म्हणजे उत्साह, दिवाळी म्हणजे आनंद. दिवाळीतील प्रत्येक दिवसांचे वेगवेगळं महत्त्व आहे. त्यातील एक महत्त्वत्वाचा दिवस म्हणजे नरकचतुर्दशी. नरकचतुर्दशीला सकाळी पहाटे उठून सुगंधी तेल, बेसन, हळद आणि उटणे लावून अभ्यंगस्नानाची परंपरा आहे. आपण सर्वजण कामानिमित्त आपल्या दैनंदिन आयुष्यात व्यस्त असतो. अशात नरकचतुर्दशीला अभ्यंगस्नान करणं अनेकजण नित्याने पाळतात. मात्र तुम्हाला अभ्यंगस्नानाचे आरोग्यदायी आणि वैज्ञानिक फायदे ठाऊक आहेत का ? 

अभ्यंगस्नानाआधी आपण सुगंधी तेलाचा वापर करतो. दिवाळीचा सण हिवाळ्यात येणारा, त्यामुळे आपली त्वचा कोरडी झाली असते. अंगावर तेल लावल्याने हे तेल आपल्या त्वचेत मुरून त्वचा तजेलदार होते. सोबतच तेलाच्या मालिशमुळे आपल्या शरीरावरील आणि मनावरील ताण कमी होण्यास मदत होते. महत्त्वाची बाब म्हणजे तेलाने केलेल्या मालिशमुळे आपल्या शरीरातील नसा मोकळ्या होतात, त्यामुळे रक्ताभिसरण देखील उत्तम होते आणि हृदयाकडे जाणारा आणि हृदयाकडून जाणारा पुरवठा अधिक नीट होतो.

त्यानंतर शरीरावर उटणे, हळद आणि बेसन लावले जाते. बेसन, हळद आणि उटण्यामध्ये आयुर्वेदिक तत्त्व असतात जे आपल्या त्वचेसाठी उपयुक्त ठरतात. हळद आणि उटण्यामुळे आपली त्वचा अधिक तजेलदार होते. या तिघांच्या मिश्रणाचा आणि मालिशचा परिणाम आपल्या चेहऱ्यावरील आणि त्वचेवरील डेड सेल्स देखील काढण्यास मदत करतात. सोबतच आपण जेंव्हा तेल आणि उटण्याने शरीराची मालिश करतो तेंव्हा शरीरातील स्नायू देखील मजबूत होण्यास मदत होते. त्यामुळे पाठीच्या मणक्यातील गॅप किंवा ठिसूळ हाडांवर देखील उपचार होतात असं डॉक्टर्स सांगतात. दरम्यान, कोणताही त्रास असल्यास मालिश कशी करावी हे तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच मगच करावे .

रोजच्या धावपळीच्या आयुष्यात, धकाधकीच्या जीवनात आपल्याला दररोज अशी शाही अंघोळ, अभ्यंगस्नान करणे शक्य नाही. मात्र जमल्यास आपण कधीही अशी आंघोळ करू शकतो असं डॉक्टर सांगतात. 

health benefits of taking bath with oil and uthne with turmeric powder and besan
  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com