पनवेलमध्ये 4 लाखहून अधिक नागरिकांची तपासणी

दीपक घरत
Saturday, 3 October 2020

उपचाराअंती 17 हजार 483 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असल्याने सध्या 1 हजार 832 रुग्णांवर पालिका हद्दीतील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत; तर 436 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. 

पनवेल : पालिका हद्दीत राबवण्यात येत असलेल्या "माझे कुटुंब, माझी जवाबदारी' मोहिमेंतर्गत आतापर्यंत 1 लाख 5 हजार 437 कुटुंबांची तपासणी करण्यात आली. या कुटुंबातील 4 लाख 6 हजार नागरिकांची तपासणी पालिकेमार्फत नेमण्यात आलेल्या आरोग्य सेवकांनी केल्याची माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली. 

सुशांत सिंह केस : "महाराष्ट्राच्या बदनामीचा मोदी सरकारचा कट, सूत्रधारांच्या अटकेसाठी SIT नेमा"

पालिकेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार तपासणीदरम्यान 268 नागरिकांमध्ये सर्दी, ताप, खोकला आदी लक्षणे दिसून आल्याने लक्षण आढळलेल्या नागरिकांमधील 227 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी 94 नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले. पालिकेच्या वतीने पालिकेचे कर्मचारी व स्वयंसेवकांच्या 233 पथके तयार करण्यात आली आहेत. 18 सप्टेंबरपासून आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त संजय शिंदे व वैद्यकीय अधिकारी सुनील नखाते यांच्या निर्देशानुसार प्रत्यक्षात सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेत पालिकेमार्फत तयार करण्यात आलेली पथके घरोघरी जाऊन नागरिकांच्या आरोग्यासंबंधित चाचण्या घेत आहेत. सर्दी, खोकला, ताप आदी लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांच्या कोरोना संदर्भातील चाचण्या करत असल्याने पालिका हद्दीत वाढत असलेल्या कोरोना रुग्णांचा आकडा येत्या काळात नियंत्रणात येण्याची शक्‍यता आहे. 

महत्त्वाची बातमी: सुशांतची हत्या नव्हे तर आत्महत्याच, एम्सने CBI कडे पाठवला अहवाल

कोरोना रुग्णांची सद्यस्थिती - 
पनवेल पालिका हद्दीत आतापर्यंत कोरोनाची लागण झालेले 19 हजार 751 रुग्ण आढळून आले आहेत. उपचाराअंती 17 हजार 483 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असल्याने सध्या 1 हजार 832 रुग्णांवर पालिका हद्दीतील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत; तर 436 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. 

(संपादन : वैभव गाटे)

health checkup of more than 4 lakh citizens in Panvel


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: health checkup of more than 4 lakh citizens in Panvel