तंबाखूमुक्‍त म्‍हसळा तालुक्‍याला काळिमा

म्‍हसळा : म्हसळा शाळा नंबर १ च्या समोरील सत्यनारायण तंबाखू विक्री केंद्र आणि भोला पानटपरीवर म्हसळा पोलिस व तालुका आरोग्य विभागाने कारवाई केली.
म्‍हसळा : म्हसळा शाळा नंबर १ च्या समोरील सत्यनारायण तंबाखू विक्री केंद्र आणि भोला पानटपरीवर म्हसळा पोलिस व तालुका आरोग्य विभागाने कारवाई केली.

म्हसळा (वार्ताहर) : विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने राज्य सरकारने शैक्षणिक संस्था व शाळांचा परिसर तंबाखूमुक्त करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी शाळेच्या १०० यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्याचा आदेश सरकारने काढला. मात्र, या आदेशाची पायमल्ली झाल्याचे म्हसळा तालुक्‍यात झालेल्या कारवाईतून दिसून आले. विशेष म्हणजे म्हसळा तालुक्‍याला तंबाखूमुक्‍त गौरवले होते. या कारवाईमुळे तालुक्‍याला काळीमा लागल्याचे नागरिकांमध्ये चर्चा आहे.

राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळेच्या १०० यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. त्यासाठी मुंबईतील सलाम बॉम्बे फाऊंडेशन या संस्थेने मुंबई महापालिकेसह पालघर, रायगड व अन्य जिल्ह्यांत शैक्षणिक संस्था व शाळांचा परिसर तंबाखूमुक्त करण्याचा निर्णय घेतला. पुढे सरकारने तंबाखूमुक्त महाराष्ट्र असे धोरण राबवले; परंतु फारसे यश आले नाही. रायगड जिल्ह्यात २०१५-१६ च्या तंबाखूमुक्त शाळा अभियान राबवण्यात आले. त्यात म्हसळा तालुका व शिक्षण विभागाला विविध स्तरावर गौरविण्यात आले. मात्र, आता ‘पुढचे पाठ, मागचे सपाट’ या उक्तीनुसार म्हसळा शाळा नंबर १ च्या समोर तंबाखूविक्री सर्रास केली जात होती. त्यावर म्हसळा पोलिस व तालुका आरोग्य विभागाने गुरुवारी सत्यनारायण तंबाखू विक्री केंद्र आणि भोला पानटपरीवर २००३ च्या कलम २४ नुसार कारवाई केल्याचे पोसई दीपक डूस यांनी सांगितले. 

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गणेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली शैलेश लाखे, महेंद्र रहाटे, गणेश शिरसाट, श्रीकेश पाटील, पोलिस विभागाचे कैलास लक्कस, वाहतूक पोलिस अमोल निर्मळ यांनी कारवाई केली. पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी परिसरातील अन्य तंबाखू, गुटखाविक्री व्यावसायिकांना समज दिल्याचे 
सांगण्यात आले.
 

सध्या जिल्हा व तालुका शिक्षण विभागात प्रचंड दिरंगाई, कामचुकारपणा आहे. २०१५ ला तालुक्‍यात तंबाखूमुक्त शाळा कार्यक्रम राबविताना प्रत्येक गावात, शाळेत आम्ही सर्व लोकप्रतिनिधी तत्कालीन गट शिक्षण अधिकारी विजया टाळकुटे यांच्यासह जाऊन जनजागृती केली होती. 
- महादेव पाटील, माजी सभापती, पंचायत समिती, म्हसळा

कर्करोग होण्यास तंबाखू हा सर्वांत महत्त्वाचा धोक्‍याचा घटक आहे. देशातील एकूण कर्करोगाच्या प्रमाणांपैकी ३४ टक्‍के कर्करोग तंबाखूमुळे होत असतो. तंबाखूमध्ये सुमारे चार हजार विविध रासायनिक घटक असून, त्यापैकी कमीतकमी एकूण ४३८ घटकांमुळे कर्करोग होत असतो. धूम्रपानामुळे फुफ्फूस, स्वरयंत्‌, अन्ननलिका व श्‍वसननलिकेचा कर्करोग होतो; तसेच धूम्रपान स्वादूपिंड, मूत्राशय, मूत्रपिंड, मूत्रनलिका, प्लिहा आणि गर्भाशय कर्करोग होण्यासही कारणीभूत आहे. तोंडाचा कर्करोग होण्यास तंबाखू सेवन मुख्यत: कारणीभूत आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल.
- डॉ. गणेश कांबळे, आरोग्य अधिकारी, म्हसळा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com