आरोग्य विभागाचा कर्मचाऱ्यांसाठी फतवा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 जून 2018

मुंबई - पूर्वपरवानगीशिवाय आरोग्य अधिकारी-कर्मचारी यांना त्यांचे कार्यालय सोडता येणार नाही. परवानगीविना जर कोणी दांडी मारली असेल आणि तसे सिद्ध झाले, तर त्या अधिकारी-कर्मचारी याचे तत्काळ निलंबन करण्याचा निर्णय आरोग्यविभागाने केला आहे. याबाबतचा फतवा सार्वजनिक आरोग्य विभागाने काढला आहे.

क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी कार्यालयीन दिवशी वेळेत कार्यालयात उपस्थित नसतात. तसेच अनुपस्थितीबाबत वरिष्ठांची पूर्वपरवनागी घेत नाहीत. त्याचबरोबर अनुपस्थितीबाबत वरिष्ठांच्या कानावर घालत नाहीत, ही बाब निदर्शनास आली आहे. हे टाळण्यासाठी आरोग्य विभागाने अशा कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबनाच्या कारवाईचा बडगा उगारला आहे. यामध्ये अशा प्रकारे दोषी असलेल्या कर्मचारी-अधिकारी यांची माहिती संकलित करून ती आरोग्य सेवा संचालनालयास कळवावी. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असेही या शासननिर्णयात म्हटले आहे.

Web Title: health department employee rules