

Daily wage worker
ESakal
मुंबई : महापालिकेचे कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना यावर्षीच्या दिवाळीसाठी तब्बल ३१ हजारांचे सानुग्रह अनुदान (बोनस) जाहीर करण्यात आले आहे. महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी १६ ऑक्टोबर रोजी बोनस जाहीर केला आणि दुसऱ्याच दिवशी १७ ऑक्टोबर रोजी कर्मचाऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली. यामुळे कायम कर्मचाऱ्यांची दिवाळी उजळली; मात्र त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करणारे सुमारे १,२०० रोजंदारी आणि बहुउद्देशीय कामगार अद्याप बोनसपासून वंचित आहेत.