लॉकडाऊनचा थेट 'मोठा' परिणाम होतोय महिलांच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यावर...

लॉकडाऊनचा थेट 'मोठा' परिणाम होतोय महिलांच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यावर...

मुंबई: कोरोनामुळे संपूर्ण देशात २१ दिवसांचं लॉकडाऊन पाळण्यात येतोय. त्यात सर्व शाळा, महाविद्यालयं, खासगी कार्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. नोकरी करणाऱ्या काही लोकांना सुटी मिळालीये तर अनेक जण घरातून काम म्हणजेच वर्क फ्रॉम होम करतायत. अशात वर्क्स फ्रॉम होम करणाऱ्या महिलांवर लॉकडाऊनमुळे अधिक ताण येतोय.

लॉकडाऊन असल्यामुळे कुटुंबातले सगळेच जण घरीच आहेत. त्यात सुट्टी असल्यामुळे लहान मुलांची आणि कुटुंबातल्या इतर व्यक्तींची जबाबदारी घरातल्या महिलांवर आलीये. ज्या महिला नोकरी करतात त्यांना वर्क फ्रॉम होम देण्यात आलंय. त्यामुळे या महिलांना घर सांभाळून दिवसभर घरून ऑफिसचं काम करावं लागतंय. यामुळे त्यांच्यावरचा ताण वाढतोय.

महिलांचा ऑफिस जाण्या-येण्याच्या वेळेची वर्क फ्रॉम होममुळे बचत होतेय, त्यामुळे त्यांच्याकडून जास्त कामाची अपेक्षा ठेवली जातेय. तसंच घरात काम करणाऱ्यांना भांडी वलय बाई किंवा जेवण बनवणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुट्टी दिल्यामुळे  या कामाचा संपूर्ण ताण घरातल्या महिलांवर येतोय. त्यात पुरुष मंडळींचा घरकामात काहीही सहभाग नसल्यामुळे सर्व कामं महिलांनाच करावे लागत आहेत.

महिलांकडे स्वतःसाठी वेळच नाही :

महिला सध्या ऑफिस आणि घर या दोन्हीचं काम सोबत करत आहेत. त्यामुळे त्यांना स्वतःसाठी वेळच नाहीये. महिलांना लहान मुलांना, घरातल्या वृद्ध व्यक्तींना सांभाळावं लागतंय त्यासोबत ऑफिसचं कामही करावं लागतंय. त्यामुळे महिलांवर या गोष्टींचा अतिरिक्त ताण येतोय.

महिलांवर येतोय शारीरिक आणि मानसिक ताण :

महिलांना घरकाम करून त्यानंतर वर्क फ्रॉम होम करावं लागतंय. घरकाम केल्यामुळे महिलांवर शारीरिक ताण येतोय. तर ८-१० तास ऑफिसचं काम केली केल्यामुळे महिलांवर मानसिक ताणही येतोय. त्यामुळे सध्या महिला या दोन्ही समस्यांचा सामना करत आहेत.

महिलांच्या घरकामातही झालीये वाढ :

लॉकडाऊनमुळे बच्चेकंपनी आणि इतर कुटुंबीय घरी असल्यामुळे महिलांवर त्यांना काय हवं नको हे बघण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे महिलांच्या कामात अतिरिक्त वाढ झाली आहे. महिलांच्या या 'अनपेड' कामाचा अंदाजही लावणं कठीण आहे. मात्र इतक्या तणावातही महिला चोखपणे आपलं काम करत आहेत.

लॉकडाऊनमध्ये घरचं आणि ऑफिसचं काम करूनही कधीही न थकणाऱ्या महिलांना यामुळे सलाम करावाच लागेल.

corona crisis health of women is directly affected by covid 19 lockdown

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com