मद्यपींसाठी एकदम आनंदाची बातमी, आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणालेत...

मद्यपींसाठी एकदम आनंदाची बातमी, आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणालेत...

मुंबई,ता.21ः सोमवार (ता.20)रोजी पत्रकारांशी बोलतांना मद्य विक्री सुरू करण्यासाठी नागरिकांनी सोशल डिस्टंन्सींगचे नियम काटेकोरपणे पाळले आवश्य़क असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले होते. त्यानंतर मंगळवारी (ता.21)रोजी त्यांनी अशा काटेकोर नियमानंतरच मद्यविक्री सुरू होण्याचे संकेत ट्विट करून दिल्याने, मद्यप्रेमींनी ही त्यांना ट्विटरवर धन्यवाद मानले आहे.

राज्यातील लाॅकडाऊनमूळे राज्यात मद्य विक्री बंद केल्याने तळीरामांचे हाल झाले आहे. मद्य पिण्याची सवय या तळीरामांना स्वस्त बसू देत नाही. त्यामूळे सोशल मिडीयाच्या माध्यमातून दिवसातून एक तास तरी मद्य विक्री सुरू करण्याची मागणीच चक्क या तळीरामांनी यापुर्वी केली आहे. 

मात्र, कोरोनाचे सावट जो पर्यंत राज्यावरून दुर होणार नाही. तोपर्यंत मद्य विक्री सुरू होणार नसल्याचे संकेत राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले होते. त्यामूळे मद्यप्रेंमीचा हिरमोड झाला होता. मात्र, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी त्यांच्या अधिकृत ट्विटर वरून काटेकोर नियमानंतरच मद्य विक्री संदर्भात अंतीम निर्णय घेता येईल असे ट्विट केल्यानंतर मद्यप्रेंमीनी ट्विटरवरच आनंद व्यक्त करत, आरोग्य मंत्र्यांचे धन्यवाद मानले आहे. तर काहींनी मद्यविक्री सुरू करण्यासाठी विरोध सुद्धा केला आहे.

health minister rajesh tope on sale of liquor read full news

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com