मुंबई कोरोनाच्या तिसऱ्या पायरीवर? राजेश टोपे यांनी स्प्ष्टपणे केला 'मोठा' खुलासा...

सुमित बागुल
शुक्रवार, 31 जुलै 2020

मुंबईमध्ये नुकताच सिरो सर्व्हेक्षणाचा पहिला टप्पा पार पडला. या पार्श्वभूमीवर मुंबईची हर्ड इम्यूनिटीच्या दिशेने वाटचाल आहे असं देखील बोललं जातंय.

मुंबई : मार्च महिन्यापासून सुरु झालेला कोरोना लॉकडाऊन आज जुलै संपला तरीही पूर्णपणे उठलेला नाही. आता अनलॉकडाऊन सुरु झालंय खरं,  अशात कोरोना विरोधातील लढ्यात आपण कुठवर पोहोचलोय याची  सर्वांनाच उत्सुकता आहे. मुंबई, देशाची आर्थिक राजधानी. मुंबईतील रुग्णसंख्या कमी होतेय, रुग्ण दुपटीचा दर देखील ७० दिवसांच्या वर गेलाय. मात्र मुंबईत आजही हजारच्या आसपास नवीन कोरोना रुग्ण दररोज आढळून येतायत. अशात प्रश्न उपस्थित होतोय तो म्हणजे मुंबई स्टेज तीनवर म्हणजेच मुंबईत समूह संसर्ग झालाय का ? यावर महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्वतः उत्तर दिलंय. राजेश टोपे एका इंग्रजी वृत्तसमूहाशी बोलत होते. 

मोठी बातमी - हृदयद्रावक ! एकाच वेळी पोलिस दलात सहभागी झालेल्या जुळ्या भावांवर कोरोनाने एकत्रच घातला घाला...

मुंबईमध्ये नुकताच सिरो सर्व्हेक्षणाचा पहिला टप्पा पार पडला. या पार्श्वभूमीवर मुंबईची हर्ड इम्यूनिटीच्या दिशेने वाटचाल आहे असं देखील बोललं जातंय. अशात मुंबईतील सिरो सर्व्हेक्षणाबाबत ICMR सोबत चर्चा केली जाणार असल्याचं राजेश टोपे म्हणालेत. खरंतर मुंबईत कोरोनाचा समूह संसर्ग झालाय की नाही याचा निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारांना नाही. त्याचा अधिकार केवळ ICMR आणि जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO यांच्याकडे आहे. त्यामुळे याबद्दल तेच आपल्याला सांगू शकतात असंही राजेश टोपे म्हणालेत. 

मोठी बातमी -  मुंबई पुण्यातील लॉकडाऊन फसला का ? मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मांडलं स्पष्ट मत...

मुंबईबाबत अधिक सविस्तर बोलताना राजेश टोपे म्हणालेत की झोपडपट्टी भागात ५७% लोकांची संख्या कोरोनाबाधित असल्याचं समोर आलंय. सार्वजनिक शौचालयामुळे झालं असावं. कारण मुंबईतील रहिवासी वसाहतींमध्ये कोरोना संक्रमणाचं प्रमाण केवळ पंधरा ते सोळा टक्क्यांवर आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात समूह संक्रमण झालेलं आहे असं आपण म्हणू शकत नसल्याचं नसल्याचंही राजेश टोपे म्हणालेत. 

health minister rajesh tope speaks on corona pandemic stage of mumbai city 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: health minister rajesh tope speaks on corona pandemic stage of mumbai city