Health News: ज्येष्ठ नागरिकांच्या सांधेदुखीमध्ये 20 ते 30 टक्क्यांनी वाढ

Health News: ज्येष्ठ नागरिकांच्या सांधेदुखीमध्ये 20 ते 30 टक्क्यांनी वाढ

मुंबई: वातावरणातील थंड- गरम बदलांमुळे ज्येष्ठ नागरिकांच्या सांधेदुखीमध्ये 20 ते 30 टक्क्यांनी वाढ झाल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. गेल्या सात आठ दिवसांपासून राज्यामध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे येथे फक्त रात्रीच्या वेळी थंडी (गारवा) चोर पावलांनी दाखल होत असून दुपारी अचानक वातावरणात बदल होऊन उकाडा होण्यास सुरुवात होते. सकाळी गारवा आणि दुपारी उकाडा अशा विचित्र वातावरणामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य बिघडत असल्याची माहिती आरोग्य क्षेत्रामधून समोर आली आहे.

मकरसंक्रातीनंतर घामाघूम होत असलेले शहरातील नागरिक गेले चार दिवस सकाळच्या वेळेस थंड हवेची मजा घेत असले तरी जेष्ठ नागरिकांमध्ये सांधेदुखीची तक्रार वाढीस लागल्याचे निरीक्षण रुग्णालयांनी मांडले आहे.
 
चाळीशीत संधीवाताचा त्रास

तेरणा स्पेशालिटी रुग्णालयाचे अस्थिव्यंगतज्ञ आणि शल्यविशारद डॉ. समीर चौधरी यांनी सांगितले की, " गेल्या 20 वर्षात झपाट्याने बदललेल्या जीवनशैलीमुळे मुंबई आणि लगतच्या शहरांमध्ये  गुडघेदुखीच्या आजारात 20 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. प्रामुख्याने थंडीच्या काळात आणि ढगाळ हवामानात संधिवात आजार आपले डोके वर काढतो. मानसिक ताण-तणाव, व्यायामाचा अभाव, एसीमध्ये सतत बसून काम करणे, आहाराच्या बदललेल्या सवयी या गोष्टी संधिवात वाढण्यास कारणीभूत आहेत. पूर्वी वयाच्या पन्नाशीनंतर दिसून येणारा हा आजार आता चाळीशीनंतर दिसून येत आहे.

ऋतुमानानुसारही व्याधी बळावतात

हिवाळी ऋतू हा अनेक जुन्या व्याधी आणि दुखण्यांना निमंत्रण देणारा ठरतो. अनेक वयस्कर लोकांना या काळात सांधेदुखीचा त्रास जाणवू लागतो. काही व्यक्तींना चालताना, उठताना आणि बसताना किंवा कोणतेही काम करताना सांध्यांमधून कळा येतात. काहींना एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाणे कठीण होऊन बसते. स्नायूंचे दुखणे, हाडांच्या जॉईंटमध्ये दुखणे, गुडघेदुखी, हाडांचा ठिसूळपणा, पाठदुखी, आमवात आदी आजार हे संधिवाताचे विविध आजार वाढण्याचा धोका या वातावरणात होण्याचा अधिक धोका आहे.

थंडीत जास्त त्रास, आहारावर लक्ष द्या - आहारतज्ज्ञ

थंडीत मुख्यत्वेकरून जुनाट आजार, त्वचेच्या समस्या, फ्रॅक्चर झालेल्या हाडांच्या समस्या पुन्हा उद्भवण्यास सुरुवात होते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. नेहमी दुखत असलेल्या अवयवांचे थंडीच्या मोसमात दुखणे वाढते. थंडीच्या दिवसांत धातूचे प्रमाण (कॅल्शियम) आणि ‘ड’ प्रथिन या दोन घटकांवर जास्त लक्ष केंद्रित केले पाहिजे, असा सल्ला आहारतज्ञ प्रतीक्षा कदम यांनी दिला आहे. मासे, अंडी आणि प्रथिनयुक्त अन्नपदार्थ यांचा आहारातील वापर अत्यल्प ठेवावा. कर्बोदकांचा आहारात समावेश करावा. हिवाळ्यात भूक अधिक लागते. त्यामुळे, जेवणाच्या मधल्यावेळी पौष्टिक कोशिंबीर, सूप, विविध प्रकारचा सुका मेवा असा पौष्टिक आहार जेष्ठ नागरिकांनी घ्यावा, रात्री उशिरा भरपेट जेवण करू नये, वजन जास्त असल्यास कमी करावे, नियमित योगासने करावी आणि सकाळी चालायला जावे, असे केल्यास सांधेदुखीचा त्रास होत नाही असेही त्यांनी सांगितले.

-----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Health News 20 to 30 percent increase joint pain in senior citizens

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com