

Bribery Scandal in Palghar: Medical Officer Nabbed Red-Handed
esakal
-निखिल मेस्त्री
पालघर: पालघरमधील डहाणू तालुकास्थित असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र गंजाडच्या भरारी पथकातील वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय माणिक सांगळे याला 35 हजार रुपयांची लाच घेताना पालघरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. डॉ. सांगळे याने वाहनभाडे मंजूर करण्यासाठी तब्बल एक लाखांच्या जवळपासाची लाच मागितली होती. त्यातील 35 हजार रुपयांची लाच घेताना त्याला आज ताब्यात घेतले आहे. सांगळे याच्यावर डहाणू पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.