esakal | कोरोनामुक्त रुग्णांमध्ये आरोग्य समस्या? आरोग्याची काळजी घेण्याचे तज्ज्ञांचे आवाहन
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनामुक्त रुग्णांमध्ये आरोग्य समस्या? आरोग्याची काळजी घेण्याचे तज्ज्ञांचे आवाहन

कोरोनाचा संसर्ग झालेले अनेक रुग्ण उपचारानंतर बरे होऊन सुखरूप घरी परतले आहेत; पण कोरोनातून मुक्त झालेल्या अनेक रुग्णांमध्ये विविध शारीरिक आजार बळावत असल्याचे चित्र आहे.

कोरोनामुक्त रुग्णांमध्ये आरोग्य समस्या? आरोग्याची काळजी घेण्याचे तज्ज्ञांचे आवाहन

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : कोरोनाचा संसर्ग झालेले अनेक रुग्ण उपचारानंतर बरे होऊन सुखरूप घरी परतले आहेत; पण कोरोनातून मुक्त झालेल्या अनेक रुग्णांमध्ये विविध शारीरिक आजार बळावत असल्याचे चित्र आहे. यात ऑगस्ट ते ऑक्‍टोबर 2020 या महिन्यात कोव्हिडमधून बाहेर आलेल्या बऱ्याच रुग्णांना श्‍वसनाशी संबंधित आजार झाला आहे; तर 15 टक्के रुग्णांना थकवा जाणवत आहे. सात टक्के रुग्णांमध्ये फुप्फुसाचा फायब्रोसिस झाल्याच्या तक्रारी आहेत, अशी माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली. 

हेही वाचा - कॉमेडी क्वीन भारती सिंगला चार तासांच्या चौकशीनंतर NCBकडून अटक

सध्या कोरोनातून बरे झालेल्या अनेक रुग्णांना पुन्हा कोरोनाचा संसर्ग होत आहे. अशावेळी आजारातील गुंतागुंत वाढू शकते. जगभरात अशी अनेक प्रकरणे समोर येऊ लागली आहेत. विशेषतः कोव्हिडच्या प्रोटोकॉलनुसार उच्चरक्तदाब, मधुमेह आणि लठ्ठपणा या समस्येने पीडित लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्‍यक आहे. या लोकांमध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांना या आजाराचा संसर्ग होण्याच्या धोका अधिक असतो. त्याचप्रमाणे कोरोनातून बाहेर आलेल्या बऱ्याच रुग्णांना स्नायू, सांधेदुखी, अंगदुखीचा त्रास जाणवतो. अशावेळी वेळीच निदान व उपचार करणे गरजेचे आहे. अन्यथा गुंतागुंत अधिक वाढल्यास ती प्राणघातक ठरू शकते, असा इशारा अपोलो क्‍लिनिक पल्मोनोलॉजिस्ट डॉ. कुंदन मेहता यांनी दिला. त्या म्हणाल्या, कोव्हिडमुक्त झालेल्या 100 रुग्णांपैकी 15 टक्के लोकांमध्ये पोस्ट-कोव्हिडची लक्षणे दिसून येत आहेत. यात 15 टक्के रुग्णांना थकवा जाणवत आहे, तर सात टक्के रुग्णांमध्ये फुप्फुसाचा फायब्रोसिस झाल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. याशिवाय पायात गुठळ्या झाल्याची माहितीही रुग्णांनी दिली. मधुमेह, उच्चरक्तदाब, दमा आणि लठ्ठपणा असणाऱ्या लोकांना अधिक त्रास होऊ शकतो. क्वचितप्रसंगी 1000 मधील दोन जणांना हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा झटका येऊ शकतो. कोरोनाची लागण झाल्यानंतर न्यूमोनिया झालेल्यांना दीर्घकालीन काळजी घ्यावी लागते. या रुग्णांनी कोरोनातून ठणठणीत बरे झाल्यानंतरही आरोग्याकडे दुर्लक्ष करू नयेत. तब्येत ठीक नसल्यास तातडीने डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. 

हेही वाचा - भिवंडीतील आयजीएम रुग्णालय हायब्रीड; एकाच वेळी कोव्हिड, नॉन कोव्हिड रुग्णांवर उपचार

कोव्हिडमधून बरे झालेल्या रुग्णांना स्नायू दुखणे, सांधेदुखी, थकवा, घसा खवखवणे, शरीरावर वेदना आणि अगदी श्‍वासोच्छवासाच्या तक्रारी जाणवत आहेत. ते रुग्णालयात उपचाराकरिता येत आहेत. कोमट पाणी प्यावे. धूम्रपान आणि मद्यपान टाळावे. पुरेशी विश्रांती घ्यावी आणि योग किंवा ध्यान करावे. जर घसा खवखवत असेल तर मीठ आणि पाण्याने गुळण्या करणे आवश्‍यक आहे. कोव्हिडची कुठलीही लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा. 
- डॉ. कुंदन मेहता,
पल्मोनोलॉजिस्ट, अपोलो क्‍लिनिक 


Health problems in corona free patients Health experts appeal

-----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )