
"माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या मोहिमेने चांगलाच वेग घेतला असून, मंगळवारी सकाळी वांद्रे पूर्व येथे मातोश्री निवासस्थानी बृहन्मुंबई महापालिकेच्या एच पूर्व प्रभागातील पथकाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्यांची आरोग्यविषयक तपासणी केली.
मुंबई : "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या मोहिमेने चांगलाच वेग घेतला असून, मंगळवारी सकाळी वांद्रे पूर्व येथे मातोश्री निवासस्थानी बृहन्मुंबई महापालिकेच्या एच पूर्व प्रभागातील पथकाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्यांची आरोग्यविषयक तपासणी केली.
पालिकेच्या पथकाने ठाकरे कुटुंबातील सर्वांची ऑक्सिजन पातळी, तापमान तपासले आणि आरोग्यविषयक माहिती भरून घेतली. या वेळी मुख्यमंत्र्यांनी या पथकाशी चर्चा करून या मोहिमेची अंमलबजावणी कशा रीतीने केली जाते. त्याविषयी माहिती घेऊन उपयुक्त सूचना केल्या. राज्यभर अशा प्रकारची मोहीम सुरू असून, त्यामुळे कोरोनाबाधितांचे निदान लवकर व्हायला मदत होणार असल्याचे सरकारने म्हटले आहे. निदान लवकर झाले तर अशा रुग्णांवर तातडीने उपचार करता येतील. त्यामुळे कोरोनाचा प्रसारही रोखला जाणार आहे.
या मोहिमेंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक घरात महिन्यात दोन वेळा आरोग्याची चौकशी करण्यासाठी सरकारचे एक पथक जाईल. मास्कचा वापर आता स्वतःच्या सुरक्षेसाठी "ब्लॅक बेल्ट' म्हणून करावा. सदा सर्वदा मास्क लावावा. शिवाय बाहेरून आल्यानंतर कुटुंबाला विषाणूचा संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यावी. बोलताना फेस टू फेस बोलणे टाळण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला. शिवाय ऑनलाईन खरेदीवर भर देण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले होते.
-----------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)