
मुंबईकरांची प्रवासकोंडी कमी करण्यासाठी एसटीच्या एक हजार बस बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. यातील 200 बस यापूर्वीच बेस्ट प्रशासनाला मिळाल्या आहे. त्यानंतर आता सोमवारी (ता.5) पुन्हा 300 बस बेस्टच्या ताफ्यात दाखल झाल्या आहे.
मुंबई : मुंबईकरांची प्रवासकोंडी कमी करण्यासाठी एसटीच्या एक हजार बस बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. यातील 200 बस यापूर्वीच बेस्ट प्रशासनाला मिळाल्या आहे. त्यानंतर आता सोमवारी (ता.5) पुन्हा 300 बस बेस्टच्या ताफ्यात दाखल झाल्या आहे. उर्वरित 500 बस या 10 ऑक्टोबरपर्यंत मिळणार असून, या बस अहमदनगर, सातारा, सोलापूर विभागातून कुर्ला, नेहरू नगर, बोरीवली आगारात आल्या आहेत.
राज्य सरकार टप्याटप्याने मुंबई अनलॉक करत आहे. त्यामूळे सरकारी आणि निमसरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. शिवाय खासगी कर्मचाऱ्यांचीही संख्या वाढत असल्याने, वाढत्या प्रवाशांचा ताण सार्वजनिक वाहतूकीवर पडत आहे. लोकल सेवा बंद असल्याने अनेक कर्मचाऱ्यांना वाहतूक कोंडी आणि मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यासाठी मुंबई उपनगरातील मार्गांची बऱ्यापैकी माहिती असलेल्या आणि 55 वर्षांखालील आणि प्रती बस दोन चालक-वाहकांना या बसवर नियुक्त करण्यात आले आहे. शहरातील बेस्ट बसप्रमाणे सुरक्षित सेवा देण्यासाठी आठ वर्षांपेक्षा कमी आयुर्मान असलेल्या बसचा वापर केला जाणार आहे. तर प्रवाशांना चढ-उतरतांना सोपे व्हावे म्हणून बसचे दरवाजे काढण्यात येणार आहे.
आगारनिहाय बसची सेवा
एसटी विभाग बस संख्या बस पाठविण्याचे ठिकाण
अहमदनगर 100 कुर्ला नेहरू नगर
सातारा 100 बोरीवली नॅन्सी कॉलनी
सोलापूर 100 बोरीवली नॅन्सी कॉलनी
धुळे 100 ठाणे (सीबीएस)
रत्नागिरी 100 परळ आगार
सांगली 100 मुंबई सेंट्रल आगार
बीड 100 कुर्ला नेहरू नगर
कोल्हापूर 100 परळ आगार
-----------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)