आरोग्य व्यवस्था कोमात; वेंटीलेटर आणि डायलिसीस मशिनसह रुग्णवाहीका धुळ खात

आरोग्य व्यवस्था कोमात; वेंटीलेटर आणि डायलिसीस मशिनसह रुग्णवाहीका धुळ खात

मुंबई, ता. 28 : मुंबई महानगरपालिकेतील वैद्यकिय यंत्रणा कोविड काळातही वापराविना पडून आहेत. केंद्र सरकारकडून आलेले 45 वेंटीलेटर धुळ खात पडले आहे. तर, 12 डायलिसीस मशीनसाठी पाणी शुध्द करणारे यंत्र नसल्याने त्या वापरता येत नव्हत्या. मात्र आता या मशिन्स देऊनही  मशिनची जोडणी करण्यासाठी महापालिकेला तज्ज्ञ मिळत नाही अशी अवस्था आहे. अशीच वाईट अवस्था पालिकेच्या सर्व वैद्यकिय सुविधांनी सज्ज असलेल्या आठरुग्णवाहिकांचा  रुग्णवाहीका बंद पडल्या आहेत.

पालिकेच्या आरोग्य समितीत वेंटीलेटर, डायलिसीस मशिन बाबत तसेच रुग्णवाहीकांबाबत चर्चा झाली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या डॉ. सईदा खान यांनी कुर्ला भाभा रुग्णालयात पडून असलेल्या व्हेंटीलेटर मशिनचा मुद्दा उपस्थीत केला. केंद्र सरकारकडून मिळालेले 45 व्हेंटीलेटर भाभा रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. मात्र, त्यांचा वापरच होत नाही असा मुद्दा उपस्थीत केला. तर, 12 डायलिसीस मशिनही पालिकेने नव्याने विकत घेतल्या. मात्र, या मशिनसाठी शुध्द पाण्याचा पुरवठा करणारे आर. ओ मशिनच नव्हते. स्वत:च्या सामाजिक संस्थेमार्फत हे मशिन उपलब्ध करुन दिले. मात्र, आताही संपुर्ण यंत्रणा बसवणारे तज्ज्ञ कर्मचारी पालिकेकडे नाहीत असा आरोपही त्यांनी केला.

भाजपच्या बिना दोषी यांनी बंद असलेल्या रुग्णवाहीकांचा मुद्दा उपस्थीत केला. रुग्णांना एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी अद्यावत यंत्रणा या रुग्णवाहीकांमध्ये आहे. मात्र, ती वाहानेच काही महिन्यांपासून बंद आहेत असा आरोप दोषी यांनी केला.

कोविड काळात व्हेंटीलेटर, डायलिसीस मशिन तसेच रुग्णवाहीकांचा गंभिर तुटवडा निर्माण झाला होता. मात्र, जी उपकरणे उपलब्ध आहेत. त्यांचा वापर पालिका पुर्ण क्षमतेने करु शकत नाही असा आरोपही सदस्यांनी केला. याबाबतची पुर्ण माहिती आरोग्य समितीपुढे सादर करण्याचे निर्देश प्रविणा मोरजकर यांनी दिले.  

( संपादन - सुमित बागुल )

health system in critical state ventilators and other important machines are not used since many days

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com