बनावट औषधांच्या विक्रीचा सुळसुळाट; अन्न व औषध प्रशासनाचे सावधानतेचे आवाहन

FDA
FDAsakal media

मुंबई : राज्यभरात बहुतांश ठिकाणी बनावट जीवनावश्यक (fake medicines selling) औषधांची विक्री (Food and drug administration) होत आहे. अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईत ही बाब उघड झाली आहे. यात राज्याप्रमाणेच परराज्यातूनही बनावट औषधे विक्रीस येत असून, ही औषधे खरेदी करताना सावधानता बाळगण्याचे आवाहन (precautions appeal) औषध विभागातर्फे करण्यात आले आहे.

FDA
मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथकानं नष्ट केले 14 कोटींचे अमली पदार्थ

अन्न व औषध प्रशासन, मुंबई येथील गुप्तवार्ता विभाग आणि मे. इंटास फार्मास्युटिकल या उत्पादकांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने गोब्युसेल इंजेक्शन बॅच क्र. ९७१३००७२, एम/एस इंटस फार्मास्युटिकल, अहमदाबाद या औषधासारखे बनावट औषध देशातील काही राज्यांमध्ये विक्री होत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती.

त्या माहितीच्या आधारे मे. जोगेश्वरी फार्मा, घाटे कॉम्प्लेक्स, चाळीसगाव (जि. जळगाव) या घाऊक औषध विक्रेत्याकडे गुप्तवार्ता विभाग व जळगाव कार्यालयाच्या पथकाने ४ डिसेंबरला धाड टाकली. या कारवाईत पेढीने संशयित बनावट औषधाचा २२० वायल्स इतका साठा चंदिगड येथून विनाखरेदी बिल प्राप्त केला होता. तसेच त्याची विक्री औषध विक्रीचा परवाना नसलेल्या पंजाब येथील मे. श्रीक्रिधा इंटरनॅशनल हेल्थकेअर या पेढीस करण्यात आल्याचे आढळून आले.

या प्रकरणी पेढीचे मालक जितेंद्र खोडके व मे. श्रीक्रिधा इंटरनॅशनल हेल्थकेअरचे मालक सुनील ढाल यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा प्रकारची काही औषधे बाजारात विक्रीस येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जीवनाश्यक औषधे वापर व विक्री करण्यापूर्वी ती योग्य मार्गाद्वारे प्राप्त झाले आहे की नाही त्याची खात्री करावी. तसेच काही शंका असल्यास अन्न व औषध प्रशासनास संपर्क करावा, असे आवाहन राज्याभरातील रुग्णालये तसेच औषध विक्रेत्यांना करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com