esakal | माजी ग्रुहमंत्री अनील देशमुख यांनी ईडीविरोधात केलेल्या याचिकेवर एकलपीठाकडे सुनावणी
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

माजी ग्रुहमंत्री अनील देशमुख यांनी ईडीविरोधात केलेल्या याचिकेवर सुनावणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : माजी ग्रुहमंत्री अनील देशमुख (Anil Deshmukh) यांनी ईडीविरोधात (ED) केलेल्या याचिकेवर एकलपीठाकडे सुनावणी घ्यायची कि खंडपीठापुढे यावर सोमवारी मुंबई उच्च न्यायालय (Mumbai High Court )निर्णय देणार आहे. याचिकेवर खंडपीठापुढे सुनावणी घेण्याचा दावा ईडीच्या वतीने करण्यात आला आहे.

ईडिने सुरू केलेल्या कारवाई आणि समन्सविरोधात आतापर्यंत नेहमी दोन सदस्यीय खंडपीठापुढे सुनावणी होत असते. त्यामुळे देशमुख यांनी केलेल्या याचिकेवरदेखील खंडपीठापुढे व्हायला हवी, त्यामुळे एकलपीठाकडे यावर सुनावणी होऊ शकत नाही,असा युक्तिवाद अतिरिक्त सौलिसिटर जनरल अनील सिंह यांनी न्या संदीप शिंदे यांच्यापुढे केला.मात्र ही याचिका कायदेशीर द्रुष्टीने योग्य आहे, आणि तिची सुनावणी एकलपीठाकडे होऊ शकते, असा दावा याचिकादार देशमुख यांच्या वतीने एड अनिकेत निकम यांनी केला. यामुळे न्या शिंदे यांनी याचिकेवर सुनावणी घेण्याबाबतचा निर्णय सोमवारपर्यंत राखून ठेवला.

हेही वाचा: परमबीर सिंह यांच्या अडचणीत आणखी वाढ

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे आरोपांवर सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. यावर ईडीने देखील चौकशी सुरू केली असून देशमुख यांना समन्स बजावले आहे. या समन्सविरोधात देशमुख यांनी याचिका केली आहे. सध्या एकलपीठाकडे याचिकेवर सुनावणी सुरू आहे.

देशमुख यांची एक याचिका सर्वोच्च न्यायालयातही प्रलंबित आहे. यावरही ईडीकडून आक्षेप घेण्यात आला. यावर सर्वोच्च न्यायालयात असलेली याचिका पूर्ण कारवाई विरोधात आहे तर उच्च न्यायालयात केवळ समन्सविरोधात याचिका केली आहे, असा खुलासा देशमुख यांच्या वतीने करण्यात आला. तपास अधिकारी काही माहिती देत नाही, केवळ बातम्या पसरवून तणाव निर्माण करत आहेत, असा आरोप यावेळी करण्यात आला.

loading image
go to top