निवडणूक कामावरील अधिकाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू 

राहुल जगताप
राहुल जगताप

मुंबई : विक्रोळी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक कार्यालयातील अधिकाऱ्याचा सोमवारी (ता. 15) दुपारी 1 च्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्‍याने मृत्यू झाला. राहुल जगताप असे या अधिकाऱ्याचे नाव आहे.

बेलापूरचे रहिवासी असणारे राहुल हे राज्य सरकारच्या "ईआरटीएल' विभागात कार्यरत होते. त्यांची क्षेत्रीय अधिकारी म्हणून विक्रोळी मतदारसंघातील निवडणूक कार्यालयात नियुक्ती झाली होती. ते सोमवारी नियमितपणे कार्यालयात हजर होते. दुपारी 12 च्या सुमारास त्यांच्या पाठीत अचानक दुखू लागले. निवडणूक अधिकारी अजित नैराळे यांनी राहुल यांनी एका सहकाऱ्याच्या मदतीने रुग्णालयात जाण्यास सांगितले.

विक्रोळीतील टागोर नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पालिका रुग्णालयात राहुल यांना नेण्यात आले; मात्र तपासणी सुरू असताना दुपारी 1 वाजता त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यात त्यांचा मृत्यू झाला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com