
मुंबई : मागील तीन दिवसांपासून मुंबईत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनात लाखो मराठे बांधव पाठिंबा दर्शवत आहेत. दरम्यान या आंदोलनाचा आज सोमवार (ता. १) चौथा दिवस असून आजपासून पाणी देखील न पिण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन कर्त्यांचा ओघ वाढत असल्याचे दिसून येत आहे.