मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटणार; 13 दिवसांत तीन महिन्यांचा पाणीसाठा

समीर सुर्वे
Thursday, 13 August 2020

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने गत 13 दिवसात तीन महिन्यांचा पाणीसाठा जमा झाला आहे.

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात जून-जुलै महिन्यात पावसाने ओढ दिल्यामुळे मुंबईवर पाणी कपातीचे संकट ओढवले.सध्या मुंबईकरांवर 20 टक्के पाणीकपातीचे संकट ओढावले आहे. मात्र, ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने चांगलाच जोर धरल्याने मुंबईवरील पाणीसंकट कमी झाले आहे.

दादर, माहीममध्ये 'या' ठिकाणी होणार कृत्रिम तलावांची निर्मिती; मनसेच्या पाठपुराव्याला यश

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने गत 13 दिवसात तीन महिन्यांचा पाणीसाठा जमा झाला आहे. गुरुवार (ता.13) पर्यंत शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये 8 लाख 70 हजार 842 दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा असून पूर्णक्षमतेच्या 60 टक्के पाणीसाठा आहे. तर आगामी आठवडाभर तलावक्षेत्रात धुवांधार पावसाची शक्‍यता असल्याने पाणीसाठ्यात वेगाने वाढ होणार आहे.

वसई - विरारमध्येही गणरायाच्या आगमन आणि विसर्जनासाठी महापालिकेने ठरवली ही नियामावली; जाणून घ्या सविस्तर

मुंबईला वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी 14 लाख 47 हजार दशलक्ष लिटर पाण्याची गरज असते. 1 ऑगस्ट रोजी तलावात अवघा 5 लाख 1 हजार 160 दशलक्ष लिटर म्हणजे 34.63 दशलक्ष लिटर पाणीसाठा होता. त्यामुळे सध्या 20 टक्के पाणी कपात सुरु आहे. मात्र, गेल्या 13 दिवसात झालेल्या पावसाने तलावात तीन लाख 69 हजार 697 दशलक्ष लिटर पाण्याची भर पडली आहे. हे पाणी शहराला तीन महिने पुरू शकेल असे असले तरी गेल्या दोन वर्षांच्या तुलनेने कमीच पाणीसाठा तलावांमध्ये आहे. 2019 मध्ये आजच्या दिवसापर्यंत 13 लाख 37 हजार दशलश लिटर आणि 2018 मध्ये 12 लाख 77 हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा होता.

जबरदस्त! धारावीत ऑगस्ट महिन्यात एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू नाही

मुंबईत असलेले विहार आणि तुळशी हे दोन्ही तलाव ओसंडून वाहू लागले आहेत. अप्पर वैतरणा हे धरण नाशिक जिल्ह्यात असून मध्य वैतरणा, मोडकसागर, भातसा आणि तानसा हे तलाव ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्‍यात आहेत. या भागात पुढील सोमवारपर्यंत धुवांधार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे तलावातील पाणीसाठा अधिक वेगाने वाढणार आहे.

मुसळधार पावसाचा वाहनांना फटका; वसईमध्ये नादुरुस्त वाहनांची गॅरेजमध्ये गर्दी

तलावातील पाणीसाठा (दशलक्ष लिटर )

----
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy railfall in dams near mumbai, collects 3 months water storage in 13 days rain


तलाव पाणीसाठा आवश्‍यक साठा
अप्पर वैतरणा 97141 227047
मोडकसागर 90642 128925
तानसा 88674 145080
मध्य वैतरणा 123058 193530
भातसा 435583 717037
विहार 27698 27698
तुलसी 8046 8046