esakal | नवी मुंबई परिसरात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस | Rain
sakal

बोलून बातमी शोधा

Heavy Rain

नवी मुंबई परिसरात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: मुंबईसह (Mumbai rain) नवी मुंबई पट्टयात मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. काल संध्याकाळी सुद्धा ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस कोसळला होता. आजही तशाच पद्धतीने पाऊस सुरु आहे.

काल पावसामुळे ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड होऊन पनवेल-ठाणे ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत झाली होती. कर्जत कल्याण आणि कसारा कल्याण मार्गही काहीवेळासाठी बाधित झाला होता.

हेही वाचा: NCB च्या विश्वासहर्तेवर प्रश्नचिन्ह, समीर वानखेडेंचे सडेतोड उत्तर

अजूनपर्यंत तरी पावसामुळे कुठे पाणी साचल्याचे वृत्त नाहीय. एक-दोन तासाच्या मुसळधार पावसाने मुंबापुरीची तुंबापुरी होत असल्याचा आतापर्यंतचा अनुभव आहे. पाणी साचल्यास रस्ते वाहतूक कोलमडून पडते.

loading image
go to top