मुंबईत पावसाचा धुमाकुळ; अनेक ठिकाणी साचले पाणी

नेत्वा धुरी
मंगळवार, 3 जुलै 2018

रेल्वे वाहतूकीवरही परिणाम झाला. मध्य रेल्वेची वाहतुक काही काळ बंद झाली. सकाळी साडे अाठपर्यंत १३१.४ मिमी पावसाची नोंद झाली. प्रतिक्षानगर (सायन) परीसरात पावसामुळे पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

मुंबई : मुंबईत सकाळपासून पावसाच्या धुमाकुळीमुळे चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले. रात्रीपासूनच पावसाचा जोर वाढल्याने जागोजागी पाणी साचल्याने रस्ते वाहतूक ठप्प झाली होती.

रेल्वे वाहतूकीवरही परिणाम झाला. मध्य रेल्वेची वाहतुक काही काळ बंद झाली. सकाळी साडे अाठपर्यंत १३१.४ मिमी पावसाची नोंद झाली. प्रतिक्षानगर (सायन) परीसरात पावसामुळे पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

नागरिकांना गुडघाभर पाण्यातून वाट काढण्यासाठी कसरत करत आहेत. बेस्ट बस सेवा वडाळा मोनो स्टेशन मार्गे वळवण्यात आली आहे. परीसरातील शाळांना सुटी देण्यात आली आहे. मानखुर्दमध्येही संततधार सुरूच असून, मानखुर्द-घाटकोपर मार्गावरील वाहतूक मंदावली आहे. जोरदार पावसाने टिळकनगर रेल्वे कर्मचारी वसाहतीला देखील चांगलेच झोडपले असून या वसाहतींमध्ये पावसाचे पाणी तुंबल्याने नागरिकांना दैनंदिन कामे करण्यासाठी जिकरीचा सामना करावा लागत आहे. तर अनेक वाहने पाण्याखाली गेल्याने स्थानिकांचे मोठे नुकसान झाले आहे. 

Web Title: heavy rain in Mumbai