
अत्यावश्यक सेवा म्हणून सुरू असलेली लोकल सेवाही ठप्प झाली आहे. मध्य रेल्वे स्थानकावर सायन इथं ट्रॅकवर पाणी साचले आहे.
मुंबईः मुंबई शहर आणि उपनगरात आजही मुसळधार पाऊस सुरुच आहे. हवामान विभागाने मुंबई परिसरात आज आणि उद्या रेड अलर्ट जारी केला आहे. सोमवारी रात्रीपासून पाऊस सुरु आहे. अत्यावश्यक सेवा म्हणून सुरू असलेली लोकल सेवाही ठप्प झाली आहे. मध्य रेल्वे स्थानकावर सायन इथं ट्रॅकवर पाणी साचले आहे. तसंच परेल आणि सायन स्थानकात पाणी साचल्याने मध्य रेल्वे ठप्प झाली आहे.
Due to high tide resulting in water logging at Vadala and Parel suburban services are suspended on main line & harbour line. No suburban trains are held up in between stations. Down mail/express trains are being rescheduled: Central Railway #MumbaiRain
— ANI (@ANI) August 4, 2020
सीएसएमटी ते ठाणे वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर ठाणे ते कल्याण, कर्जत कसारा वाहतूक सुरू आहे. हार्बर मार्गावर वडाळा स्थानकात पाणी भरल्याने सीएसएमटी ते वाशी वाहतूक ठप्प झाली आहे. वाशी ते पनवेल वाहतूक सुरू आहे.
हेही वाचाः मोठी दुर्घटना टळली, पश्चिम एक्सप्रेस हायवेजवळ दरड कोसळली
पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवा ठप्प झाली असून मध्य रेल्वे मार्गावरील गाड्या उशिराने धावत आहेत. कुर्ला-सीएसएमटी हार्बर मार्गावरील वाहतूकही बंद आहे. तर ठिकठिकाणी पाणी साचल्याने बेस्ट बसचे आठ मार्ग बदलण्यात आलेत. दादर प्रभादेवी रेल्वे रुळावर 200 मीमी पाणी साचलं आहे. दादर रेल्वे स्थानकावर लोकल थांबल्या आहेत. वांद्रे ते डहाणू रोड दरम्यानची लोकल सेवा सुरु आहे.
अधिक वाचाः Mumbai Rain Updates: गरज असेल तरच बाहेर पडा!, मुंबईत रात्रभर तुफान पाऊस
हिंदमाता, दादर टीटी, शक्कर पंचायत, एसआयईएस महाविद्यालय, गोयल देऊळ, भेंडी बाजार जंक्शन, ठाकुरद्वार नाका, षण्मुखानंद हॉल, शेख मिस्त्री दरगाह मार्ग, पोस्टल कॉलनी इथे पाणी साचलं आहे.
Heavy rain mumbai local train services affected road traffic hit