नवी मुंबईत मुसळधार पाऊस, 15 झाडे कोसळली

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 जून 2018

नवी मुंबई : कुलाबा वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार नवी मुंबईत रात्री दीडच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सकाळी आठ वाजेपर्यंत सुरू असलेल्या पावसाची 138.06 एमएम इतकी नोंद झाली. पावसासोबत हवेच्या वेगाने शहरात 15 ठिकाणी झाडांची पडझड झाली. 

रात्री उशिरा अचानक पावसाने मुसळधार कोसळण्यास सुरुवात केली. यामुळे शहरात दिघ्यातील ईश्वरनगर, रामनगर, राबळे एमआईडीसीतील कंपनीत, तुर्भे, एपीएमसी मार्केट, तुर्भे अंजुमन शाळे मागे, घणसोली गाव व वाशी सेक्टर 7 परिसरात गुडघाभर पाणी साठले होते. दिघा भागातील काही झोपड्यांमध्ये पाणी घुसले होते. पावसासोबत आकाशात प्रचंड जोरात विजांचा कडकडाट सुरू होता. सोसाट्याचा वारा सुटल्यामुळे शहरातील विविध ठिकाणची 15 झाडे कोसळून काही वाहने व इमारतींच्या संरक्षण भतींचे नुकसान झाले. 

विमानतळ क्षेत्रातील गावात पाणी
नवी मुंबई अंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सुरू असलेल्या मातीच्या भरावामुळे शेजारच्या कोंबडभुजे गावात पावसाचे पाणी घुसले. गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेसह ग्रामस्थांच्या घरात गुडघाभर पाणी घुसले होते. रात्रभर पाऊस सुरू असल्यामुळे सकाळ पर्यंत गावातील ग्रामस्थांना पुराच्या भीतीने जगता पहारा ठेवावा लागला. मात्र कोणतीही सरकारी यंत्रणा सकाळ पर्यंत गावात पाणी बाहेर काढण्यासाठी पोहचली नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

Web Title: heavy rain in new mumbai 15 trees are fallen