मुंबईकरांनो सावधान! पुढच्या 24 तासांमध्ये मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता..

समीर सुर्वे 
Tuesday, 14 July 2020

मुंबईसह कोकणात बुधवारी  मुसळधार पावसाचा इशारा वेधशाळेने दिला आहे. कोकणातील काही भागांमध्ये 204 मिमी पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे.सर्व यंत्रणांना सज्जतेचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई:  मुंबईसह कोकणात बुधवारी  मुसळधार पावसाचा इशारा वेधशाळेने दिला आहे. कोकणातील काही भागांमध्ये 204 मिमी पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे.सर्व यंत्रणांना सज्जतेचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबईतील काही भागात संध्याकाळी पावसाने चांगला जोर धरल्याने हिंदमाता,वडाळासह अनेक भागात पाणी तुंबले होते.

 हेही वाचा: मनसेनं गूगलला पत्र पाठवून केली 'ही' महत्वाची मागणी..वाचा सविस्तर बातमी  

मुंबई शहरात सकाळी 8 ते संध्याकाळी 35.18,पूर्व उपनगरात 25.85 आणि पश्चिम उपनगारत 49.40 मिमी पाऊस नोंदविण्यात आला. सर्वाधिक पाऊस दादर पुर्व परीसरात 97.02 मिमी नोंदविण्यात आला.परळ,दादर, सांताक्रुझ, विलेपार्ले या परीसरात संध्याकाळी जोरदार पाऊस झाला.त्यामुळे काही ठिकाणी घरांची पडझड झाली तर काही झाडं पडल्याच्या तक्रारीही नोंदविण्यात आल्या आहेत.

जोरदार पावसामुळे हिंदमाता,दादर टि.टी, वडाळा सक्कर पंचायत चौक,वडाळा फयार स्टेशन,धारावी जंक्शन,अंधेरी सबवे,मानखुर्द बैगनवाडी,कुर्ला नेहरु नगर,आशिष जंक्शन चेंबूर या ठिकाणी काही काळ पाणी साचले होते.

मुंबईत आज दिवसभर पावसाळी ढग दाटून आले होते.अशीच परीस्थीती उद्या राहाणार आहे.मुंबईसह संपुर्ण कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे.काही भागात 100 ते 204 मिमी पर्यंत पाऊस होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: युजीसी उपाध्यक्षांनी केली विद्यापीठाच्या परीक्षेची दारूसोबत तुलना; शिक्षक विद्यार्थी संघटना आक्रमक

सोमवारी दुपारी वेधशाळेने जाहीर केलेल्या अंदाजात बुधवारी रत्नागिरी,सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टाचा अंदाज व्यक्त करत रेड अलर्ट जारी केवा होता.मात्र,आज दुपारी सुधारित अंदाज व्यक्त कर मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. मात्र, नैदल, कोस्टगार्ड, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल तसेच स्थानिक प्रशासनाला सज्जतेचा इशारा दिला आहे.

heavy rain in next 24 hours in mumbai 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy rain in next 24 hours in mumbai