मनसेनं गूगलला पत्र पाठवून केली 'ही' महत्वाची मागणी..वाचा सविस्तर बातमी  

mns and google maps
mns and google maps

मुंबई: देशात तिसऱ्या क्रमांकाची बोलल्या जाणारी भाषा म्हणजेच मराठी भाषेचा समावेश गूगल मॅप वर करावा, अशी मागणी मनसे पदाधिकारी मिलिंद पांचाळ यांनी केली आहे. 

गूगल मॅप च्या व्हॉइस सिलेक्शन मध्ये इंग्लीश, उर्दू, हिंदी, गुजराती, बांग्ला व चार दाक्षिणात्य भाषा आहेत. इतकेच नव्हे तर यात मलेशिया, कोरिया आदी जगातील अनेक देशांच्या भाषाही आहेत. 

आपल्याला एखादा पत्ता हवा असल्यास या मॅपमधून आपल्याला दिशांनुसार तसे सांगितले जाते. त्यासाठी वरीलपैकी कोणतीही भाषा आपण निवडू शकतो, मात्र यात मराठी भाषेचा समावेश नसल्याने तो करण्यात यावा, अशी पांचाळ यांची मागणी आहे

सन 2011 च्या जनगणनेनुसार देशात हिंदी व बंगालीनंतर जास्त बोलली जाणारी मराठी हीच देशी भाषा आहे. देशात आठ कोटी 30 लाख लोक मराठी बोलतात. महाराष्ट्रात 68.96 टक्के मराठी बोलतात, तर गोव्यात मराठी भाषकांचे प्रमाण 10.89 टक्के आहे. दादरा नगर हवेली येथे 7 टक्के, दीव दमण येथे 4.53 टक्के लोक मराठी बोलतात. 

कर्नाटकात 3.38 टक्के, मध्य प्रदेशात 1.70 टक्के तर गुजरातेत 1.5 टक्के लोकांची भाषा मराठी आहे. किंबहुना जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठीचा 11 वा क्रमांक आहे. त्यामुळे या भाषेचा योग्य तो मान राखण्यासाठी तिचा समावेश गूगल मॅप्स मध्ये करावा, असे पांचाळ यांनी गूगल ला पत्राद्वारे कळवले आहे.

संपादन : अथर्व महांकाळ 

include marathi language in google maps MNS seeks to google 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com