मुसळधार पावसामुळे पालघर जिल्ह्यातील काही भाग जलमय

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जुलै 2018

बोर्डी (पालघर) : रविवारी (ता. 8) पहाटेपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने बोर्डी, घोलवड परिसर जलमय झालाआहे. तलाव, नदी, नाले तुडूंब भरले असून शेती पाण्याखाली आली असल्याने कामात व्यत्यय आला आहे.

मागील चोवीस तासात 175 मिमी तर चालु हंगामात 1125 मिमी पावसाची नोंद झाली आहे. रविवारी पहाटे पासून या परिसरात पावसाची संततधार सुरु झाली होती. दुपारी चार वाजता नंतर पावसाने विश्रांती घेतली. मात्र रविवारी मध्यरात्री पासून पुन्हा पावसाचा जोर वाढला. सोमवारी सकाळी संततधार सुरुच होती.

दरम्यान पावसाचा जोर वाढल्याने शाळांना सुट्टी घोषित करण्यात आली. तत्पुर्वी शेती पाण्याखाली आल्याने शेतीची कामे बंद पडली होती. उंबरगाव औद्योगिक वसाहतीत सुट्टी असल्याने कामगारांना दिलासा मिळाला.

बोर्डी, घोलवड गावातील रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले होते. धोकादायक खुटखाडी पुलावर पुराच्या पाण्याची पातळी वाढल्याने लहान वाहानांची वाहतूक धिम्या गतीने सुरु होती. दरम्यान समुद्रात भरतीची वेळ झाल्याने पाण्याच्या पातळीत वाढ होण्याच्या भितीने सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

रेल्वेसेवा विस्कळीत झाल्याने चाकरमान्यांना अर्ध्यारस्त्यातून परत यावे लागले. बारा वाजेपर्यंत पावसाचा जोर कायम असून ग्रामस्थांनी घरात राहणेच पसंत केल्याने दैनंदिन व्यवहारावर परिणाम झाला आहे.

Web Title: heavy rain in palghar district