MumbaiRains : कल्याणमध्ये मुसळधार पावसाची हजेरी; लोकलला उशीर

रविंद्र खरात 
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

कल्याण पूर्वमध्ये दुर्गा माता रोडवर शुक्रवारी रात्री धोकादायक इमारतीचा काही भाग कोसळला असून आज त्या धोकादायक इमारत मधील 5 कुटुंबांना सुरक्षित हटवुन इमारत पाडली जाईल अशी माहिती तर प्रभाग क्षेत्र अधिकारी भागाजी भांगरे यांनी दिली.

कल्याण : कल्याण डोंबिवली शहरी भागात मुसळधार पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने अनेक भागात पावसाचे पाणी साठण्यास सुरुवात झाली आहे. 

कल्याण रेल्वे स्थानक मध्ये रुळावर पाणी साचण्यास सुरुवात झाल्याने लोकल गाड्या उशिराने धावत आहे. फलाट एक, एक( ए) दोन आणि तीन वर रुळावर पाणी आल्याने लोकल गाड्या येत नसल्याने प्रवाश्याना चांगलाच त्रास सहन करावा लागला कसारा आणि कर्जत कडून कल्याणकडे 45 मिनिट लोकल उशिरा येत असून मुंबईकडे जाणाऱ्या ही लोकलला लेटमार्क असून नशीब कल्याण रेल्वे स्थानक मध्ये घोषणा होत असल्याने प्रवाश्याना दिलासा मिळाला अशी माहिती प्रत्यक्ष दर्शी प्रवासी नितीन शिंदे याने सकाळला दिली.

कल्याण पूर्वमध्ये दुर्गा माता रोडवर शुक्रवारी रात्री धोकादायक इमारतीचा काही भाग कोसळला असून आज त्या धोकादायक इमारत मधील 5 कुटुंबांना सुरक्षित हटवुन इमारत पाडली जाईल अशी माहिती तर प्रभाग क्षेत्र अधिकारी भागाजी भांगरे यांनी दिली. तर शहराच्या आजू बाजूच्या नाले आणि नदी ओसंडून वाहत असून परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती प्रभाग क्षेत्र अधिकारी सुहास गुप्ते यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy rainfall in Kalyan Mumbai area