Mumbai Rains : मुंबईत पुन्हा होणार 26 जुलै? (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जुलै 2019

मुंबईत बुधवारी काही ठिकाणी मुसळधार सरी कोसळतील; तर शनिवारपर्यंत हलक्‍या सरी कोसळतील. मुंबईव्यतिरिक्त कोकणात शनिवारपर्यंत मुसळधार पावसाची शक्‍यता आहे, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे. 

मुंबई : मुंबई शहरासह उपनगरात पुढील दोन दिवसांत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुुंबईत पुन्हा 26 जुलै 2005 सारखी परिस्थिती उद्भवते की काय अशी शक्यता आहे. 

मुंबईत बुधवारी काही ठिकाणी मुसळधार सरी कोसळतील; तर शनिवारपर्यंत हलक्‍या सरी कोसळतील. मुंबईव्यतिरिक्त कोकणात शनिवारपर्यंत मुसळधार पावसाची शक्‍यता आहे, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे. 

उकाडा आणि तापमानवाढीमुळे मुंबईकरांना पावसाची प्रतीक्षा आहे. मंगळवारी रात्रीपासून मुंबईत पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले असून, रेल्वे वाहतुकीवरही याचा परिणाम झाला आहे. मंगळवारी (ता.23) कमाल तापमान दोन अंशाने कमी होत 32.1 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. मध्यरात्री पावसाने हजेरी लावल्याने कमाल तापमानात थोडीशी घसरण नोंदवली गेली. दिवसभरात उकाडाही कमी जाणवल्याने घामाने त्रस्त झालेल्या मुंबईकरांना मंगळवारी दिलासा मिळाला. आज किमान तापमानात चार अंशानी घसरून 27 अंशावरून 23 अंशावर नोंदवले जाईल, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy rainfall in Mumbai area next two days says IMD