
मुंबईत पुन्हा एकदा मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. विशेषतः पूर्व उपनगरातील घाटकोपर, विक्रोळी, पवई, कांजूरमार्ग, भांडुप आणि मुलुंड या भागांत जोरदार पावसाने कहर केला आहे. मुंबईत सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं. भर दुपारीही दादर आणि माहीम परिसरात अंधारून आलं आणि अचानक पावसाला सुरुवात झाली. रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. वाहतूक २० मिनीटे उशीरा धावत आहे.