

Mumbai-Ahmedabad Bullet Train Work Affected by Rains, Core Infrastructure Remains Intact
sakal
ठाणे : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदी परिसरातील कामांना मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. नदीवरील यंत्रसामग्री, लोखंड, काँक्रीट साहित्य आणि कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी उभारण्यात आलेला तात्पुरता अॅक्सेस पूल गेल्या आठवड्यातील पुराच्या पाण्यात बाधित झाला. यामुळे प्रकल्पाच्या कामाच्या वेगाबाबत चर्चा सुरू झाली असून, प्रशासनाने मात्र मुख्य संरचना सुरक्षित असल्याचा दावा केला आहे.