

Mumbai-Goa Highway Traffic
ESakal
अलिबाग : गणेशोत्सवासाठी कोकणात शनिवारी काम संपवून रात्री उशीरा निघालेल्या गणेशभक्तांचा मार्ग मुसळधार पावसाने रोखून धरला. ठाणे येथून माणगाव पर्यंत पोहचण्यासाठी तब्बल ८ तासापेक्षा जास्त कालावधी लागला. रात्रीच्या मुसळधार पावसात खारपाडा, नागोठणे, इंदापुर, माणगाव येथे लांबचलांब रांगा लागल्या होत्या. वाहतूक पोलिसांच्या अंदाजानुसार शनिवारी रात्री ६ हजार लहानमोठी वाहने कोलाड नाका येथून तळ कोकणात प्रवास करीत होती. यात दुचाकी चालकांचे प्रमाण ३० टक्क्याहून अधिक होते. सकाळी ७.०० वाजल्यानंतर पावसाने थोडीसी उसंती घेतली असल्याने येथील कोंडी काही प्रमाणात कमी झाली आहे.