
मध्यरात्री पासून सुरु असलेल्या पावसामुळे पनवेल परिसरातील सखल भागातील रस्त्यांवर पाणी साचल्याने जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले आहे
पनवेल - मध्यरात्री पासून सुरु असलेल्या पावसामुळे पनवेल परिसरातील सखल भागातील रस्त्यांवर पाणी साचल्याने जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले आहे.रात्री पासून पडत असलेल्या पावसामुळे पनवेल शहरातील अमरधाम स्मशान भूमी,नवीन पनवेल येथील बांठिया हायस्कुल परिसर,शिव-पनवेल महामार्गावरील खांदेश्वर वसाहतीचे प्रवेशद्वार तसेच कळंबोली वसाहती मधील काही भागातील पाण्याचा निचरा योग्य रीतीने होत नसल्याने रस्ते पूर्णपणे जलमय झाल्याचे पाहायला मिळाले.
दक्षिण मुंबईतील सखल भाग जलमय, मुसळधार पावसाचा लोकांना मनस्ताप
पावसाचा परिणाम वाहतुकीवर देखील जाणवला असून शिव - पनवेल महामार्गावरील अनेक भागात पाणी साचल्याने महामार्गावरील वाहतूक बराच काळ विस्कळीत झाल्याचा परिणाम यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गे पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीवर देखील जाणवला असून शिव पनवेल महामार्गवर लागलेल्या वाहनांच्या रागांमध्ये द्रुतगती महामार्गाचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या कळंबोली मॅक्डोनाल्ड या ठिकाणी पुण्याच्या दिशेने जाणारी वाहने अडकून पडल्याचे या वेळी पाहायला मिळाले
-----------------------------------