esakal | जे.जे. रुग्णालयात शिरले पावसाचे पाणी; रुग्णांसह नातेवाईकांची तारांबळ... 
sakal

बोलून बातमी शोधा

जे.जे. रुग्णालयात शिरले पावसाचे पाणी; रुग्णांसह नातेवाईकांची तारांबळ... 

पावसाचा जोर कायम असल्याने पाण्याचा निचरा होत नव्हता. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना त्रास नको म्हणून पंप लावून पाणी काढण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला. शिवाय काही कर्मचाऱ्यांना ही पाणी उपसण्याच्या कामाला जुंपण्यात आले.

जे.जे. रुग्णालयात शिरले पावसाचे पाणी; रुग्णांसह नातेवाईकांची तारांबळ... 

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई : मुंबईत आज बुधवारीही पावसाचा जोर बघायला मिळाला. पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचले असून मुंबईतील लोकलसेवाही ठप्प झाली आहे. जोरदार वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना समोर आल्या आहे. त्याचप्रमाणे जे.जे. रुग्णालयालाही पाण्याचा पावसाचा फटका बसला. रुग्णालयात पावसाचे पाणी शिरल्याने उपचारासाठी येणाऱ्या लोकांचे  हाल होत होते.

नवी मुंबई आयुक्तांचा कामाचा धडाका, कोरोना चाचणी प्रयोगशाळा सुरु

मुंबईत कालपासूनच मुसळधार पाऊस कोसळतोय. आजही पावसाचा जोर कायम असून पावसामुळे भायखळ्यातील जे.जे. रुग्णालयाच्या तळमजल्यावर पाणी शिरले. त्यामुळे तळमजल्याचा संपूर्ण परिसर जलमय झाला होता. जे.जे. हे मुंबईतील महत्वाचे नॉन कोव्हिड रुग्णालय आहे. त्यामुळे कोव्हिड व्यतिरिक्त इतर आजारांवरील उपचारांसाठी नेहमीच गर्दी असते. लोकांसह ओपीडीमध्ये आलेल्या रुग्णांना ही पावसाचा फटका बसला.

सामनाच्या फ्रंट पेजवरील सूचक जाहिरात म्हणतेय, "हे ज्यांनी केले, त्यांचा मला अभिमान आहे !"

पावसाचा जोर कायम असल्याने पाण्याचा निचरा होत नव्हता. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना त्रास नको म्हणून पंप लावून पाणी काढण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला. शिवाय काही कर्मचाऱ्यांना ही पाणी उपसण्याच्या कामाला जुंपण्यात आले. संध्याकाळी पाऊस काहीसा ओसरल्यानंतर पाण्याचा निचरा होण्यास सुरुवात झाली.
---
संपादन : ऋषिराज तायडे

loading image
go to top