esakal | नवी मुंबई आयुक्तांचा कामाचा धडाका, कोरोना चाचणी प्रयोगशाळा सुरु
sakal

बोलून बातमी शोधा

नवी मुंबई आयुक्तांचा कामाचा धडाका, कोरोना चाचणी प्रयोगशाळा सुरु

वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. नवी मुंबई महापालिकेच्या नेरुळ येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे रुग्णालयात कोरोना टेस्ट लॅब सुरु करण्यात आली आहे.

नवी मुंबई आयुक्तांचा कामाचा धडाका, कोरोना चाचणी प्रयोगशाळा सुरु

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. नवी मुंबई महापालिकेच्या नेरुळ येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे रुग्णालयात कोरोना टेस्ट लॅब सुरु करण्यात आली आहे. नवी मुंबईतील कोरोनाबाधितांचा वाढता आकडा पाहता नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी चांगलाच कामाचा धडाका लावला आहे. रुग्ण सुविधामध्ये वाढ करण्यासाठी अभिजीत बांगर यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महापालिका हद्दीतील गंभीर रुग्णांना आयसीयू बेड उपलब्ध व्हावेत यासाठी नेरुळ सेक्टर ५ येथील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयासोबत २०० आयसीयू बेड आणि ८० व्हेंटिलेटर्स उपलब्ध करुन देण्याचा करार करण्यात आलाय. 

माँसाहेब मीनाताई ठाकरे रुग्णालयात कोरोना टेस्ट लॅबमध्ये दररोज एक हजार चाचण्या होणार आहेत. यामुळे कोरोना चाचणीसाठी लागणारा वेळ पूर्णपणे थांबणार असून, रुग्णांवर वेळेत उपचार करणे शक्य होणारेय. याआधी महापालिकेत स्वतःची लॅब उपलब्ध नव्हती. त्यामुळे कोरोनाच्या तपासण्यांसाठी महापालिकेस शासकीय किंवा खासगी लॅबवर अवलंबून राहावं लागतं होतं. दरम्यान अभिजित बांगर यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर फक्त दोनच दिवसांत  १६ जुलैपासून अँटिजेन टेस्ट करण्यास सुरुवात करण्यात आली. 

हेही वाचाः  नौदलाच्या धैर्याचं प्रतीक म्हणजे जहाजांचा 'अँकर', जहाजांच्या अँकरबद्दल रंजक माहिती...

ज्येष्ठ नागरिक तसेच मधुमेह, ब्लडप्रेशर, हृदय विकार, किडनीचे आजार अशाप्रकारचे आजार असणाऱ्या व्यक्तींकडे अधिक काळजीपूर्वक लक्ष द्यायला हवे. स्क्रिनिंग करताना ज्या ठिकाणी कोरोना बाधितांची संख्या जास्त आहे अशा भागावर विशेष लक्ष द्यावे, असं आयुक्त म्हणालेत. 

दिवसेंदिवस टेस्टिंग सेंटर वाढीवर भर देण्यात आला. सध्या २२ अँटिजेन टेस्टिंग सेंटरमधून दिवसाला २,५०० अँटिजेन टेस्ट होताहेत. त्यामध्ये आता एका दिवसात १००० आरटी-पीसीआर चाचण्या करण्याची क्षमता आहे. या ऑटोमॅटिक लॅबची भर पडलेली आहे. यामुळे तपासणी वेगाने होणारेय. प्रतिदिन १००० आरटी-पीसीआर चाचण्यांच्या करणे शक्य होणार आहे.

अधिक वाचाः  Mumbai Rain Updates: मुंबईसह उपनगरात रेड अलर्ट जारी, पालघरमध्ये NDRFची टीम तैनात

आयुक्तांचं नवी मुंबईकरांना आवाहन

नागरी आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील खाजगी व्यावसायिकांकडून तापाचे रुग्ण तसेच मधुमेह, ब्लडप्रेशर आणि इतर आजार असणा-या व्यक्तींची माहिती जमा करावी आणि त्यांची अँटीजेन टेस्ट करावी अशा सूचना दिल्या. अँटिजेन टेस्टमुळे रुग्ण संख्येत काहीशी वाढ होताना दिसत असली तरी घाबरुन न जाता रुग्ण लवकर सापडणे हे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे लक्षात घेऊन रुग्ण शोध मोहीम प्रभावीपणे राबविण्यावर आणि त्यातून कोरोनाची साखळी खंडीत करण्यावर अधिकाधिक भर द्यावा, असेही आयुक्तांनी सांगितलं. 

तसंच संपूर्ण ऑटोमॅटिक लॅब महापालिकेसाठी एक कायमस्वरूपी महत्त्वाची उपलब्धी आहे. आरोग्य विभागाचे स्वयंपूर्ण सक्षमीकरण करणारी असल्याचं आयुक्तांनी म्हटलं आहे. अँटिजेन टेस्ट आणि त्या जोडीला प्रतिदिन १००० आरटी-पीसीआर चाचण्या क्षमतेची महापालिकेची हक्काची अत्याधुनिक संपूर्ण ऑटोमॅटिक आर.टी.-पी.सी.आर. लॅब कोविड विरोधातील लढ्याला बळ देणारी असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

तसंच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिका करीत असलेल्या उपाययोजनांमध्ये स्वयंशिस्त पाळून सहकार्य करावे, असं आवाहन आयुक्तांनी केलं आहे.

navi mumbai civic body start first covid testing lab

loading image
go to top