मुंबईसह पालघरमध्ये पुढचे दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता

समीर सुर्वे
Tuesday, 20 October 2020

मुंबईसह संपूर्ण कोकणात आजपासून पावसाला पुन्हा सुरुवात होणार आहे. मुंबई, पालघरमध्ये पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह पाऊस राहणार आहे. तर,ठाण्यात गुरुवारपर्यंत पावसाचा जोर राहणार आहे.

मुंबईः मुंबईसह संपूर्ण कोकणात आजपासून पावसाला पुन्हा सुरुवात होणार आहे. मुंबई, पालघरमध्ये पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह पाऊस राहणार आहे. तर,ठाण्यात गुरुवारपर्यंत पावसाचा जोर राहणार आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग जिल्ह्याला पावसाचा सर्वाधिक फटका बसणार आहे. बुधवारपासून मुसळधार पावसाचा अंदाज मुंबई वेधशाळेने व्यक्त केला आहे.

बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे. रायगड रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यात दोन दिवस मेघगर्जनेसह पाऊस राहणार असून बुधवारपासून पावसाचा जोर वाढून शुक्रवार पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे कोकणातील भात शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.

अधिक वाचाः  ठाणे पालिकेच्या कोविड रुग्णालयात मुन्ना भाई MBBS,अर्धशिक्षित डॉक्टरांचा सुळसुळाट

आता पुन्हा पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
मुंबई आणि पालघरमध्ये पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह पाऊस राहणार असून त्यानंतर पावसाचा जोर ओसरण्यची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. ठाणे जिल्ह्यात गुरुवारपर्यंत मेघगर्जनेसह पाऊस राहण्याची शक्यता आहे. 

अधिक वाचाः  मुंबईत कोरोना हळूहळू आटोक्यात, कोविड सेंटरमधील रुग्णसंख्येत 50 टक्क्यांनी घट

मुंबईत सोमवारी कुलाबा येथे कमाल 32 आणि किमान 26.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सांताक्रुझ येथे कमाल 31.6 आणि किमान 26.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील दोन दिवस तापमान याच पातळीवर राहणार आहे.

---------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Heavy rains expected in Mumbai and Palghar for next two days


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rains expected in Mumbai and Palghar for next two days