esakal | ठाणे पालिकेच्या कोविड रुग्णालयात मुन्ना भाई MBBS,अर्धशिक्षित डॉक्टरांचा सुळसुळाट
sakal

बोलून बातमी शोधा

ठाणे पालिकेच्या कोविड रुग्णालयात मुन्ना भाई MBBS,अर्धशिक्षित डॉक्टरांचा सुळसुळाट

ठाणे कोविड सेंटरमध्ये तीन अर्धशिक्षित डॉक्टर आढळून आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे महापालिकेने केलेल्या डॉक्टरांच्या भरती प्रक्रियेवरच आता प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.

ठाणे पालिकेच्या कोविड रुग्णालयात मुन्ना भाई MBBS,अर्धशिक्षित डॉक्टरांचा सुळसुळाट

sakal_logo
By
राजेश मोरे

मुंबई: ठाणे  महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये उत्तम उपचार केले जातात असा दावा पालिकेकडून केला जात होता. मात्र आता याच कोविड सेंटरमध्ये तीन अर्धशिक्षित डॉक्टर आढळून आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे महापालिकेने केलेल्या डॉक्टरांच्या भरती प्रक्रियेवरच आता प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे. तर या संदर्भात आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी या प्रकरणाची चौकशी करुन योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे.

ठाण्यात बोगस डॉक्टरांच्या घटना अनेकवेळा पाहिल्या आहेत. मात्र आता ठाणो महापालिकेच्या ग्लोबल कोरोना रुग्णालयातच अर्धशिक्षित डॉक्टर पकडण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोविडचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी आणि गोरगरिब रुग्णांना कोविड रुग्णालय उपलब्ध व्हावे यासाठी महापालिकेनं जवळपास 1100 खाटांचे हे रुग्णालय उभे केले आहे. मात्र सुरुवातीच्या टप्यात या रुग्णालयात डॉक्टर उपलब्धच होत नसल्याची माहिती पुढे आली होती. त्यानंतर टप्याटप्याने येथे डॉक्टर घेतले गेले. त्यामुळे येथे उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांना त्याचा फायदाही झाला. 

अधिक वाचाः  मुंबईत कोरोना हळूहळू आटोक्यात, कोविड सेंटरमधील रुग्णसंख्येत 50 टक्क्यांनी घट

किंबहुना गोरगरिब रुग्णांसाठी हे रुग्णालय नवसंजीवनीच ठरल्याचे दिसून आले. मात्र आता याच रुग्णालयात अर्धशिक्षित डॉक्टर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये दोन इंटरशिप पूर्ण न केलेले तर 1 डॉक्टर हा विद्यार्थी अशा तीन बनावट डॉक्टरांना पालिकेच्या आरोग्य विभागाने पकडले आहे. त्यानंतर आता या तिघांच्या विरोधात अहवाल तयार करण्यात आला असून तो महापालिका आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे. तूर्तास या डॉक्टरांना घरी बसविण्यात आले आहे. दरम्यान महापालिका प्रशासनाने या डॉक्टरांची भरती करण्यासाठी खासगी ठेकेदाराची नियुक्ती केली होती. त्याच्याच माध्यमातून ही भरती प्रक्रिया झाली असल्याची माहिती पुढे आली आहे.  केवळ हा ठेकेदाराच दोषी आहे का?, पालिकेने या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे होते अशी चर्चा आता सुरु झाली आहे. दरम्यान या संदर्भात चौकशी करुन योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन महापालिका आयुक्त शर्मा यांनी दिले आहे.

अधिक वाचाः  दादर-माहिममध्ये कोरोना नियंत्रणात, धारावीतील परिस्थिती 'जैसे थे'

ते दोघे आयसीयूमध्ये होते रुग्णांची देखभाल करत

आयसीयूमध्ये रुग्ण दाखल असल्यास त्याच्यावर देखरेख करण्यासाठी तज्ञ डॉक्टरांची आवश्यकता असते. त्यानुसार महापालिकेच्या ग्लोबल कोविड सेंटरमध्येही तसे तज्ञ डॉक्टर होते. मात्र त्यांच्या मदतीला इंटरशिप पूर्ण न केलेले ते दोन डॉक्टर देखील आयसीयूमध्ये रुग्णांची देखभाल करीत असल्याची माहिती पालिकेच्या सुत्रांनी दिली आहे.

------------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Thane Municipality Covid Hospital three fake doctor caught

loading image